शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

नागपूर शहराचे पाणी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूरकरांना नववर्षासाठी गुड न्यूज आहे. शहराला मिळणाऱ्या पाण्यात वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी नागपूर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूरकरांना नववर्षासाठी गुड न्यूज आहे. शहराला मिळणाऱ्या पाण्यात वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी नागपूर शहरासाठी १५४ दलघमी पाणी आरक्षित ठेवण्यात आले होते. यावेळी त्यात वाढ करून १७३.५०० दलघमी इतके पाणी आरक्षित केले जाणार आहे. पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी पाणी आरक्षण बैठकीत संबंधित निर्देश दिले. त्यामुळे आता नागपूरचा पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लागला आहे.

नागपूर शहराला दररोज ६४० एमएलडी पाणी लागते. गेल्यावर्षी प्रत्यक्षात १५६ दलघमी पाणी वापरण्यात आले होते. यावर्षी कोरोना काळात नेहमीपेक्षा कमी पाणी वापरण्यात आले. त्यामुळे जून २०२१ पर्यंत १५२ दलघमी पाणी प्रत्यक्षात वापरले जाईल, असा अंदाज आहे. पाणी आरक्षणासंदर्भात सोमवारी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मनपाने वर्ष २०२०-२१ साठी पेंच प्रकल्पांतर्गत तोतलाडोह धरणातून १७३.५०० दलघमी पाणी देण्याची मागणी केली होती. पालकमंत्र्यांनी ही मागणी तात्काळ मंजूर करण्याचे निर्देश दिले. बैठकीत जिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नागपूरचे अधीक्षक अभियंता जयंत गवळी, लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश ढुमणे उपस्थित होते. या वर्षी घरगुती व औद्योगिक वापराच्या पाण्याची जितकी मागणी आहे. त्यानुसार पुरेसे पाणी उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत सिंचन विभागाने पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली.

अशी आहे मागणी

- घरघुती व औद्योगिक दोन्ही मिळून नोव्हेंबर २०२० ते जून २०२१ पर्यंत जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांतून १५१.४१ दलघमी पाणी वापरले जाईल. मध्यम प्रकल्पातून १९.४२ दलघमी व लघु प्रकल्पातून ३.२९ दलघमी पाणी वापरले जाईल. तसेच नदीवरून असणाऱ्या पाणी पुरवठ्याची मागणी ५६.१७५ दलघमी आहे.

जिल्ह्यात ७७ प्रकल्पात

१५६४.४ दलघमी पाणी उपलब्ध

- नागपूर जिल्ह्यात एकूण ७७ प्रकल्प आहेत. यात ५ मोठे, १२ मध्यम व ६० लघु प्रकल्प आहे. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे या प्रकल्पांमध्ये एकूण ८९.५६ टक्के पाणीसाठी आहे. या प्रकल्पांची एकूण पाणीसाठा क्षमता १७७७.७३ दलघमी इतकी आहे. एकूण १५६४.४ दलघमी पाणी उपलब्ध आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये १२७७.३० दलघमी, मध्यम प्रकल्पात १६०.५ व लघु प्रकल्पांमध्ये १२७.०५ दलघमी इतके पाणी आहे.