शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरनजिकच्या कन्हान नदीचा जलस्तर उन्हाळ्यापूर्वीच घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 11:21 IST

अद्याप उन्हाळ्याला सुरुवात झालेली नाही. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात कन्हान नदीचा जलस्तर घटला आहे.

ठळक मुद्देउत्तर व पूर्व नागपूरचा पाणीपुरवठा बाधित जलसंपदा विभागाने सोडले ५० क्युसेक पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अद्याप उन्हाळ्याला सुरुवात झालेली नाही. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात कन्हान नदीचा जलस्तर घटला आहे. बुधवारी सकाळी घेतलेल्या मोजमापानुसार बीणा संगम येथे नदीचा प्रवाह १२९ एमएलडी इतका होता.  या प्रवाहात कन्हान जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने चालविणे शक्य नाही. यामुळे उत्तर व पूर्व नागपूरचा पाणीपुरवठा सकाळीदेखील बाधित राहिला. ही परिस्थिती आणखी काही दिवसपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.पावसाळ्यात पूर्व विदर्भ व पेंन नदीच्या पाणलोट क्षेत्रात अपुरा पाऊ स झाला. त्यातच तोतलाडोहच्या वरील भागात मध्यप्रदेशात चौराई धरण बांधण्यात आले आहे. यामुळे तोतलाडोह प्रकल्पात ३० टक्केच जलसाठा शिल्लक आहे.यामुळे अचानक पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या उन्हाळ्यात पाण्याची संभाव्य वाढीव मागणी लक्षात घेऊ न महापालिका व ओसीडब्ल्यू यांनी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना अतिरिक्त पाणी कन्हान नदीमध्ये सोडण्याची विनंती केली आहे. त्यांच्या सूचनेनुसार जलसंपदा विभागाने उजव्या कालव्यातून ५० क्युसेक पाणी सोडले आहे. नदीत सोडलेले हे पाणी उजव्या कालव्याच्या एस्केप गेटमधून ३२ किमी प्रवास करून ७२ तासांत म्हणजेच रविवारी १० फेब्रुवारीला सकाळी १० वाजता कन्हान इनटेक वेल येथे पोहचेल. या काळात नियंत्रित पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून उत्तर व पूर्व नागपूरला कमीत कमी त्रास होईल.कालव्यात सोडलेले पाणी कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता ७२ तासांत इनटेक वेलपर्यंत पोहचावे यासाठी महापालिका व ओसीडब्ल्यू यांनी पाहणी सुरू केली आहे. कन्हान जलशुद्धीकरण येथे नदीचा प्रवाह पूर्णपणे इनटेक वेलकडे वळवण्यात आलेला आहे व तात्पुरता बंधारा बांधण्यात आला आहे .जेणेकरून उपलब्ध पाणी वाहून जाणार नाही. यासाठी जलसंपदा विभागाच्या उजव्या कालव्यात रेतीची पोती टाकलेली आहे. या पोत्यांमुळे सोडण्यात आलेले पाणी एस्केप गेटकडे वळवण्याला मदत होईल.

टॅग्स :Kanhan Riverकन्हान नदीWaterपाणी