शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पाणीकपातीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 12:01 IST

त्यामुळे भविष्यात नागपूर शहरावर पाणीसंकट ओढवण्याचे चिन्ह आहे. अशातच महापालिकेने पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे.

ठळक मुद्देपिण्यासाठी व स्वयंंपाकासाठीच वापरामनपाचे आॅक्टोबरमध्येच आवाहनपेंच व कन्हानमध्ये अत्यल्प पाणीसाठा

आॅनलाईन लोकमतनागपूर : यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. पेंच व कन्हान नदीच्या पाणलोट क्षेत्रातही सरसरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे कन्हान तसेच पेंच नदीवरील जलाशयात अत्यल्प पाणीसाठा आहे. नागपूर शहरास येथूनच पाणीपुरवठा होते. त्यामुळे भविष्यात नागपूर शहरावर पाणीसंकट ओढवण्याचे चिन्ह आहे. अशातच महापालिकेने पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे. यातून भविष्यात नागपुरात पाणीकपात केली जाण्याचे संकेत आहेत.जलाशय व नदीत उपलब्ध पाणीसाठा पाहता नागपूर शहराला फेब्रुवारीनंतर होणाऱ्या  पाणीपुरवठ्याबाबत महापालिकेची चिंता वाढली आहे. याची दखल घेत महापालिकेने आतापासून जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करा. आज वाचविलेले पाणी पुढील दिवसांत उपयोगात येईल, असे आवाहन म.न.पा. आयुक्त व जलप्रदाय विशेष समिती सभापती यांनी केले आहे. साधारणत: मार्च- एप्रिलमध्ये पेंच जलाशयातील पाण्याची पातळी कमी होते. त्यावेळी महापालिकेतर्फे असे आवाहन केले जाते. मात्र, आॅक्टोबरमध्ये असे आवाहन करण्यात आल्यामुळे काही महिन्यांनी नळाला दिवसाआड पाणी येण्याची किंवा कमी वेळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.काटकसर करामहापालिकेतर्फे पुरविण्यात येणाºया पाण्याचा शक्यतोवर फक्त पिण्यासाठी व स्वयंपाकापुरताच वापर करावा.इतर कामाकरिता उदा. बगिचा, कपडे, धुणे, अंघोळ करणे इत्यादी करीता जास्तीत-जास्त विहिरीच्या पाण्याचा किंवा विंधन विहिरींच्या पाण्याचा वापर करावा. अंघोळीकरिता शॉवरचा उपयोग टाळावा, नळाच्या तोट्या वाहत्या ठेवू नयेत.

टॅग्स :Waterपाणी