शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

उपराजधानीवर जलसंकट; काटकसरीने वापरण्याचा पालकमंत्र्यांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 10:41 IST

अपुरा पाऊस आणि जलाशयामध्ये असलेला अपुरा साठा यामुळे नागपूर शहरासह संपूर्ण जिल्हा जलसंकटाच्या छायेत आहे.

ठळक मुद्देशहरासाठी पेंचमधून १५५ दलघमी पाणीकन्हान-कोलार नदीवर बांधणार धरणसुरागोंदी-अंबाझरीतील पाण्याचाही विचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: अपुरा पाऊस आणि जलाशयामध्ये असलेला अपुरा साठा यामुळे नागपूर शहरासह संपूर्ण जिल्हा जलसंकटाच्या छायेत आहे. उन्हाळ्यात परिस्थिती अधिकच चिंताजनक होऊ शकते. त्यामुळे जलसंकटाची परिस्थिती लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचा वापर अतिशय काळजीपूर्वक व काटकसरीने करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.पेंच प्रकल्पांतर्गत असलेल्या तीन धरणांमध्ये केवळ २८३.६६८ दश लक्ष घन मीटर म्हणजे २२.४८ टक्के साठा उपलब्ध आहे. या प्रकल्पामध्ये महानगरपालिकेसाठी १५५ दलघमी पाण्याचे आरक्षण असून कळमेश्वर, पारशिवनी, रामटेक, नगरधन आदी शहरांसाठी पाणी पुरविण्यात येते. यावर्षी उपलब्ध असलेल्या जलसाठ्यानुसार शहरासाठी पाणी उपलब्ध होणार नसल्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर आवश्यक आहे. तसेच पाण्याचे इतर पर्यायही शोधले जात आहे, असे पालकमंत्री बावकुळे यांनी स्पष्ट केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात पाणी आरक्षण समितीची बैठक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. महापौर नंदा जिचकार, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, आ. सुधाकर देशमुख,आ. जोगेंद्र कवाडे, आ.डॉ. मिलिंद माने, आ.गिरीश व्यास, माजी आ. आशिष देशमुख, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता जयंत गवळी, कार्यकारी अभियंता एस.जी. ढवळे, जितेंद्र तुरखेडे तसेच सर्व नगर परिषद, नगर पंचायतचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.नागपूर शहरासाठी पेंच जलाशयातून पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी येणाऱ्या मर्यादा बघता कन्हानमधून वाहून जाणारे पाणी अडविण्याची व्यवस्था करणे तसेच कन्हान-कोलार नदीवर प्रकल्प बांधून शहराला पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने पर्याय म्हणून प्रस्ताव तयार करण्यात येत आहे, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. वाडी नगर परिषद तसेच डिफेन्ससाठी वेणा जलाशयातून पाणीपुरवठा करण्यात येतो. प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, विभागाने विद्यापीठाच्या विविध चमूतील खेळाडूंसाठी ब्लेझर, ट्रॅकसूट व स्पोर्ट कीटची खरेदी केली होती. नियमानुसार तीन लाखापर्यंत खरेदीचा अधिकार विभागाला असतो. त्यापेक्षा अधिक रकमेची खरेदी करण्यासाठी निविदा काढणे आवश्यक आहे. निविदा मागविल्यानंतर सामानाच्या खरेदीसाठी कुलगुरुंची मंजुरी घेणे आवश्यक आहे. परंतु असे करण्यात आले नाही. निविदा काढण्यापूर्वीच सामान मागविण्यात आले. विना मंजुरी घेता एका व्यक्तीला कंत्राट देण्यात आले. सामानाचा पुरवठाही झाला आहे. बिलाला मंजुरी देण्यासाठी समितीसमोर ठेवण्यात आले. यावर बैठकीत उपस्थित सदस्यांनी आक्षेप घेतला. या बाबीची गंभीर दखल घेऊन समितीने खरेदीला मंजुरी देण्यास नकार दिला. सोबतच विभागाच्या संचालक डॉ. कल्पना वसंत जाधव यांना स्पष्टीकरण मागितले होते.अपव्यय टाळण्यासाठी स्वतंत्र बैठकशहरात आधीच पाणी कमी आहे. यातच पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. यावर बैठकीत बरीच चर्चा झाली. तेव्हा शहरात पिण्याच्या पाण्याचा होणारा अपव्यव टाळण्यासंदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन उपाययोजना करण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी जाहीर केले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई