शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये शिरले पाणी, झाडेही कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 00:19 IST

जुलै महिना सुरू होताच पावसाचा जोरही वाढायला लागला आहे. मात्र या थोड्या पावसाने शहरातील व्यवस्थेचे पितळ उघडे पाडले आहे. मध्यम पावसाने खालच्या वस्त्यांमध्ये पाणी साचण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे उत्तर व पूर्व नागपूर परिसरातील अनेक जलमग्न झाल्या असून, काही वस्त्यांमध्ये तीन फुटापर्यंत पाणी जमा झाले होते. विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे लोकांची भीती वाढविली होती. मात्र तासाभरानंतर पावसाचा जोर थांबल्याने लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

ठळक मुद्देमध्यम पावसातच वाढल्या समस्या : रस्त्यावरही साचले पाणी, वाहतूक विस्कळीत

 लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : जुलै महिना सुरू होताच पावसाचा जोरही वाढायला लागला आहे. मात्र या थोड्या पावसाने शहरातील व्यवस्थेचे पितळ उघडे पाडले आहे. मध्यम पावसाने खालच्या वस्त्यांमध्ये पाणी साचण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे उत्तर व पूर्व नागपूर परिसरातील अनेक जलमग्न झाल्या असून, काही वस्त्यांमध्ये तीन फुटापर्यंत पाणी जमा झाले होते. विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे लोकांची भीती वाढविली होती. मात्र तासाभरानंतर पावसाचा जोर थांबल्याने लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

अग्निशमन विभागाला रात्री २.५० वाजताच्या सुमारास महामानवनगर बुद्धविहाराजवळच्या सांगोळकर यांच्या घरात पाणी शिरल्याची सूचना मिळाली. विभागाची टीम बचावकार्यासाठी घटनास्थळी रवाना झाली. यादरम्यान याच वस्तीतील सुरेंद्र बागडे यांच्या घरासह इतर १२ ते १५ घरांमध्ये पाणी शिरल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. दुसरीकडे सक्करदरा क्षेत्रातील गिल्लूरकर रुग्णालयाच्या मागील भागातही पाणी साचल्याच्या तक्रारी विभागाला रात्री ३ वाजताच्या दरम्यान मिळाल्या. याशिवाय मंगळवारी पहाटे ४.३० च्या सुमारास विद्यापीठ मैदानाजवळच्या सरकारी कॉलनी परिसरात झाड पडल्याची तक्रार विभागाला प्राप्त झाली. सकाळी शिवनगरच्या प्लॉट नं. १६ बीच्या घरी झाड पडल्याची तक्रार मिळाली. सकाळी ८.४० वाजता गांधी चौक, सदर तर सकाळी ९ वाजता बाबुळखेडा, जयंती मेन्शनजवळही झाड पडल्याची तक्रार अग्निशमन विभागाला प्राप्त झाली. तापमानात घट, आकाशात ढगसोमवारी मध्यरात्रीनंतर सुरू झालेला पाऊस मंगळवारी दुपारी १ वाजतापर्यंत कमी-अधिक प्रमाणात सुरू होता. दुपारनंतरही आकाशात ढग दाटले होते. सकाळी ८.३० वाजतापर्यंत नागपुरात २७.४ अंश पावसाची नोंद करण्यात आली. पावसामुळे दिवस व रात्रीच्या तापमानात उल्लेखनीय घट नोंदविण्यात आली. कमाल व किमान तापमानात सामान्यपेक्षा ४ आणि ५ डिग्रीपर्यंत घट झाली होती. कमाल तापमान २९.६ डिग्री तर किमान तापमान २०.१ डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले. सकाळी ८.३० वाजता आर्द्रता ९८ टक्के होती.विदर्भात पावसाची दमदार हजेरीगेल्या २४ तासात विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून, चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. चंद्रपुरात ३३ मिमी, ब्रह्मपुरीत २९, गोंदियात २१, गडचिरोलीमध्ये १८.६, बुलडाणा १२ तर वर्ध्यात ५.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. येत्या २४ तासात विदर्भाच्या अकोला, अमरावती, चंद्रपूर, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर