शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे दिवस बघता वीज ग्राहकांशी सौजन्यपूर्ण वागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 23:20 IST

पावसाचे दिवस बघता वीज यंत्रणेत येणारे बिघाड त्वरित दुरुस्त करून ग्राहकांना दिलासा द्या, सर्व अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, ग्राहकांची समस्या समजून घ्या, त्यांच्याशी सौजन्यपूर्ण वागा, वीजपुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागणार असेल तर त्यांना याबाबत समजावून सांगण्याच्या सूचना महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले.

ठळक मुद्देभालचंद्र खंडाईत : अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाचे दिवस बघता वीज यंत्रणेत येणारे बिघाड त्वरित दुरुस्त करून ग्राहकांना दिलासा द्या, सर्व अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, ग्राहकांची समस्या समजून घ्या, त्यांच्याशी सौजन्यपूर्ण वागा, वीजपुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागणार असेल तर त्यांना याबाबत समजावून सांगण्याच्या सूचना महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले. नागपूर परिक्षेत्रातील अकोला, अमरावती, चंद्र्रपूर, गोंदिया आणि नागपूर या पाचही परिमंडळाच्या संयुक्त आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते.अनियमितपणे वीज बिल भरणाºया ग्राहकांचा वीजपुरवठा तत्काळ प्रभावाने खंडित करण्याच्या स्पष्ट सूचना करतानाच आपली जबाबदारी योग्यरीत्या पार न पाडणाºया अधिकाºयांना कारणे दाखवा नोटिसेस बजावून त्यांची बदली इतरत्र करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. यावेळी मंडळनिहाय मागणी, महसूल वसुली आणि थकबाकी यांचा सविस्तर आढावा घेतानाच वसुली कार्यक्षमता कमी असलेल्या विभागांवर नाराजी व्यक्त करीत, या परिस्थितीत सुधारणा न झाल्यास संबंधित अधिकाºयांवर कठोर कारवाई करण्याचे सुतोवाचही त्यांनी केले.या बैठकीला नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, सुहास रंगारी, अरविंद भादीकर, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, प्रभारी उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात आदी उपस्थित होते.विस्तारित ग्राम स्वराज्य अभियानग्राम स्वराज्य अभियानात नागपूर परिक्षेत्रात उल्लेखनीय काम केले असून, विदर्भातील वाशिम आणि गडचिरोली या जिल्ह्यात १ जून ते १५ आॅगस्ट या कालावधीत ग्राम स्वराज्य अभियानाचा विस्तारित कार्यक्रम राबवायचा आहे. यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील २८१ गावांतील ५,२६० तर वाशिम जिल्ह्यातील ३९१ गावांतील १४२३ घरकुलांना सौभाग्य योजनेतून वीज जोडण्या द्यायच्या आहेत. हे उद्दिष्ट विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी सर्व संबंधितांना देण्यात आल्या.

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर