शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पॅन्ट्री कार कर्मचारी, फूड स्टॉलधारकांना निर्वाणीचा ईशारा

By नरेश डोंगरे | Updated: July 15, 2024 15:14 IST

Nagpur : खाद्य पदार्थाच्या ठिकाणी घाण आढळल्यास कठोर कारवाई

नरेश डोंगरे - नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजुबाजुला घाण ठेवून तशाच वातावरणात खाद्य पदार्थ तयार करणाऱ्या अथवा विकणाऱ्या पॅन्ट्री कारच्या कर्मचाऱ्यांना आणि ठिकठिकाणी फूड स्टॉल लावून खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना मध्य रेल्वेने निर्वाणीचा ईशारा दिला आहे. यापुढे असे काही आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.   

आसाम एक्सप्रेसमधील पॅन्ट्री कारमध्ये कशा पद्धतीने घाण आहे आणि तेथील कचऱ्याची तेथील कर्मचारी कशी विल्हेवाट लावतात, त्याचा घाणेरडा व्हीडीओ ११ जुलै २०२४ ला व्हायरल झाला. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रेल्वे प्रशासनाला अनेकांनी या संबंधाने धारेवर धरले आहे. या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वे प्रशासनाने एक प्रसिद्धीपत्रक काढून पॅन्ट्री कारच्या कर्मचाऱ्यांना आणि ठिकठिकाणी फूड स्टॉल लावून खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना निर्वाणीचा ईशारा दिला आहे. ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ बनविले जातात आणि विकले जातात, त्या ठिकाणी सर्वोत्तम स्वच्छता ठेवा. दर्जेदार खाद्यपदार्थ प्रवाशांना द्या. कुणीही घाणेरड्या वातावरणात खाद्य पदार्थ तयार करीत असतील किंवा कुणी फुड स्टॉलवाला आजुबाजूला घाण असताना तेथून काही विकत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड ईशाराही रेल्वे प्रशासनाने दिला आहे.

प्रवाशांच्या आरोग्याशी खेळू नका दोन महिन्यांपूर्वी बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून अशाच प्रकारे विकण्यात आलेल्या बिर्याणीतून अनेकांना विषबाधा झाली होती. तेव्हापासून विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल आणि वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईची विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार, सर्व गाड्यांमध्ये स्वच्छता प्रोटोकॉलचे सक्तीने पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. वेळोवेळी अनेक स्थानकावर आकस्मिक तपासणीही केली जात असून, अनेक स्टॉलधारकारंवर दंड तसेच अटकेची कारवाई करण्यात आली आहे. प्रवाशांच्या आरोग्याशी खेळू नका, अन्यथा गंभीर दखल घेतली जाईल, असा ईशाराही स्टॉलधारक तसेच पॅन्ट्री कारमधील कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे.  

टॅग्स :nagpurनागपूर