शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सावधान : नागपुरातील सहारा सिटीच्या परिसरात फिरत आहे वाघिण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 23:50 IST

शहराच्या अगदी जवळ असलेल्या वर्धा रोडवरील सहारा सिटीच्या जवळपास वाघ फिरत असल्याचे सांगितले जाते. स्थानिक नागरिकही वाघ फिरताना दिसत असल्याचे सांगताहेत; काही नागरिकांनी तर वाघासोबत तिचे छावेही असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे ती वाघिण असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देपरिसरातील नागरिकही करताहेत बघितल्याचा दावाबुटीबोरी रेंजची चमू लावणार कॅमेरा ट्रॅप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराच्या अगदी जवळ असलेल्या वर्धा रोडवरील सहारा सिटीच्या जवळपास वाघ फिरत असल्याचे सांगितले जाते. स्थानिक नागरिकही वाघ फिरताना दिसत असल्याचे सांगताहेत; काही नागरिकांनी तर वाघासोबत तिचे छावेही असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे ती वाघिण असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.सहारा सिटीच्या मागच्या बाजूला निर्माणाधीन बंगले रिकामे पडले आहेत. आजूबाजूचा परिसर झुडपी जंगलाने व्यापलेला आहे. त्याच्या मागे खापरी आणि मंगरुर वनक्षेत्र लागून आहे. त्यामुळे परिसरात वाघ दिसल्याच्या दाव्याला वन विभागही नाकारत नाही. स्थानिक नागरिक रात्रीच्या वेळी आपल्या घराबाहेर निघायलाही घाबरत आहेत.स्थानिक नागरिकांनी तर वाघाचा व्हिडिओही बनवला आहे. याची माहिती होताच नागपूर प्रादेशिक वन विभागाचे अधिकारीही वाघाच्या शोधासाठी सक्रिय झाले आहेत. सहारा सिटीच्या परिसराचे क्षेत्र नागपूर प्रादेशिकच्या बुटीबोरी वन परिक्षेत्रांतर्गत येतो. त्यामुळे सोमवारी बुटीबोरी रेंजच्या टीमने सहारा सिटीच्या परिसरात गस्त घातली, सोबतच नागरिकांची विचारपूस केली. तेव्हा त्यांनी झुडपी जंगलाच्या जवळपास वाघ दिसल्याचे सांगितले. यानंतर या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्याचा निर्णय वन अधिकाऱ्यांनी घेतला आहे. मंगळवारी सकाळीच सहारा सिटीच्या मागच्या बाजूला झुडपी जंगलात १५ ते २० कॅमरा ट्रॅप लावण्यात येतील.यासंदर्भात बुटीबोरीचे आरएफओ रवींद्र घाडगे यांनी सांगितले की, माहिती मिळताच सर्चिंग करण्यात आले. वन कर्मचारी परिसराची मॉनिटरिंग करीत आहेत. मंगळवारी कॅमेरा ट्रॅप लावण्यात येतील.महिनाभरापूर्वी बैलाची शिकारसूत्रानुसार सहारा सिटीच्या जवळ खापरी गावात महिनाभरापूर्वी एका वन्यप्राण्याने बैलाची शिकार केली होती. ही शिकार बिबट्याने केल्याचा अंदाज लावला जात आहे. वन्यप्राण्याच्या पायांचे निशाणही काही ठिकाणी सापडले आहे. परंतु या पायांचे निशाण सहारा सिटीच्या मागच्या बाजूला असलेल्या झुडपी जंगलापर्यंत जातात. त्यानंतर ते संपतात. त्यामुळे याच परिसरातून वाघिण येत असावी, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Tigerवाघnagpurनागपूर