शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात नियंत्रण कक्षातील महिला पोलिसांशी सलगी साधू पाहणाऱ्यांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 12:26 IST

पैसे आकारले जात नसल्यामुळे (टोल फ्री) क्रमांकावर वारंवार फोन करून नियंत्रण कक्षातील महिला पोलिसांशी नाहक संपर्क करू पाहणाऱ्यांना कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देटोल फ्रीचा असाही गैरवापरतीन दिवसात एकाने ५० कॉल्स केले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पैसे आकारले जात नसल्यामुळे (टोल फ्री) क्रमांकावर वारंवार फोन करून नियंत्रण कक्षातील महिला पोलिसांशी नाहक संपर्क करू पाहणाऱ्यांना कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.पोलीस नियंत्रण कक्ष हे पोलीस दलाचे महत्त्वाचे तेवढेच संवेदनशील स्थळ असते. तेथून शहरात घडणाऱ्या गुन्ह्यांची माहिती आणि विविध पोलीस ठाण्याला दिशानिर्देश दिले जातात. अडचणीत असलेल्या नागरिकांना तसेच अपघात किंवा गुन्हा घडला त्या ठिकाणांवर तातडीने पोलीस पाठविण्यासाठी नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत असते. संकटकाळी कुणालाही तातडीने मदत मिळवता यावी म्हणून इथला १०० क्रमांक टोल फ्री असतो. त्यावर फोन केल्यास पैसे लागत नाही. त्याचा गैरफायदा काही मनोविकार जडलेली मंडळी भलत्याच कामासाठी घेतात. वारंवार येथे फोन करून तेथील महिला पोलिसांशी नको त्या भाषेत बोलतात. तातडीने माहिती देऊन फोन ठेवत नाही तर कारवाईचा दम देऊनही विनाकारण वाद घालतात. त्यामुळे ही लाईन व्यस्त होते आणि अडचणीतील व्यक्तीला तातडीने नियंत्रण कक्षात संपर्क करता येत नाही.बराच वेळ त्याला फोन व्यस्त असल्याचे ऐकावे लागते. नियंत्रण कक्षात असे फोन करणाऱ्यांची संख्या अन् गैरप्रकार वाढल्याने अधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे.

तीन दिवसात एकेकाचे ५० कॉल्सवारंवार एकाच क्रमांकावरून फोन करणाऱ्या एक डझन ‘आंबटशौकिनांचा’ पोलिसांनी शोध घेतला. त्यातील एकेकाने तीन दिवसात कुणी १० तर कुणी ५० कॉल्स केले. त्या सर्वांना शोधून सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांच्यासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी पकडल्यानंतर संबंधितांचे धाबे दणाणले. त्यांनी सहआयुक्तांना पुन्हा कधीच कॉल करणार नाही अन् असभ्य भाषेचा वापर करणार नाही, अशी हमी दिल्यामुळे त्यांना ताकीद देऊन सोडून देण्यात आले.

टॅग्स :Policeपोलिस