शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या माजी नगरसेवकांसाठी धोक्याची घंटा, ३० टक्क्यांचे रिपोर्टकार्ड नकारात्मक

By योगेश पांडे | Updated: January 21, 2025 22:31 IST

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टीने पक्षाकडून पहिले सर्वेक्षण पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अद्याप काहीही स्पष्टता नसताना भारतीय जनता पक्षाकडून नियोजनाला सुरुवात झाली आहे. पक्षाने उमेदवारीच्या दृष्टीने प्रदेश पातळीवर सर्वेक्षण केले होते. मात्र त्यामुळे पक्षाची चिंता वाढली आहे. भाजपच्या माजी नगरसेवकांपैकी ३० टक्के जणांचे रिपोर्टकार्ड नकारात्मक आले आहे. त्यामुळे यातील अनेकांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याचेच संकेत, या सर्वेक्षण अहवालातून मिळाले आहेत.

विधानसभेच्या निवडणुकीनंतर पक्षाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कंबर कसण्यात आली आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यात मुंबई, ठाणे, नागपूर, नवी मुंबईसह अनेक महापालिकांचा समावेश आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेवरून प्रदेश पातळीवर एक सर्वेक्षण घेण्यात आले. त्यात सर्वच प्रभागांतील माजी नगरसेवकांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले. तसेच सध्याचे विद्यमान नगरसेवक, लोकप्रतिनिधींबाबत जनतेची मते काय हे जाणून घेतले. मात्र ३० टक्क्यांहून अधिक नगरसेवक जनतेत जाऊन कामच करत नसल्याची बाब त्यातून समोर आली. त्यामुळे पक्ष नेत्यांनादेखील धक्का बसला आहे. अशाच पदाधिकाऱ्यांमुळे पक्षाला लोकसभेत फटका बसला होता. ही बाब पक्षाकडून गंभीरतेने घेण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाकडून आणखी दोन सर्वेक्षण करण्यात येणार आहे व त्याच्या आधारावरच तिकीट वाटप होईल.

जनतेत जाऊन काम करणाऱ्यांसोबत पक्ष : शहराध्यक्षयाबाबत शहराध्यक्ष बंटी कुकडे यांना विचारणा केली असता, त्यांनी सर्वेक्षण झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला. पक्षाकडून नियमितपणे सर्वेक्षण करण्यात येतात. २०२२ नंतर सर्वच नगरसेवक माजी झाले आहेत. मात्र त्यांनी जनतेत जाऊन काम करणे अपेक्षित आहे. जो जनतेत जाऊन काम करतो आहे त्याच्यासोबत पक्ष नेहमीच असेल. अशा लोकप्रतिनिधींचा तिकीट वाटपात निश्चितपणे विचार होईल. जे कामच करत नाहीत, त्यांच्याबाबत पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व नेते निर्णय घेतील, असे कुकडे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :BJPभाजपाnagpurनागपूर