शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या ताब्यातून फरार झालेल्या ‘वॉन्टेड’ला अटक

By योगेश पांडे | Updated: April 26, 2023 17:03 IST

घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली

नागपूर : पोलिसांच्या ताब्यातून फरार झालेल्या एका ‘वॉन्टेड’ गुन्हेगाराला अखेर पकडण्यात यश आले आहे. अफरोज शमशाद अन्सारी (२१) असे गुन्हेगाराचे नाव असून तो भांडेवाडीतील एका सलूनमधून फरार झाला होता. पोलिसांनी तुकडोजी पुतळ्याजवळून त्याला सापळा रचत अटक केली.

घरफोडीच्या दोन गुन्ह्यांमध्ये पोलिस त्याचा शोध घेत होते. २० एप्रिल रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास तो भांडेवाडी येथील समाधान सलून येथे बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक व पोलिस शिपाई त्या पत्त्यावर रवाना झाले. तेथे अफरोज आढळला व त्यांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला शांतपणे सोबत चलण्यास सांगितले. मात्र, त्याने आरडाओरड सुरू केली. ते पाहून लोक तेथे जमले. मुलाबाबत ऐकताच बाप शमशाद अन्सारीदेखील मोटारसायकलने सलूनसमोर पोहोचला. त्याने पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली व पोलिस माझ्या मुलाला कसे घेऊन जातात ते बघतोच, अशी भाषा वापरू लागला. दोघेही बापबेटे हुज्जत घालून आरडाओरड करू लागले. यातच अफरोजने वीट उचलून स्वत:च्याच डोक्यात मारून घेतली. अफरोजच्या वडिलाने एका शिपायाला धक्का देत खाली पाडले व हीच संधी साधून अफरोज तेथून फरार झाला होता.

गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांक २ कडून त्याचा शोध सुरू होता. तांत्रिक तपासातून तो हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुकडोजी पुतळ्याजवळ असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचला व घेराव टाकून त्याला अटक केली. अफरोजने घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. गुन्हे शाखेने त्याला पारडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. पोलीस निरीक्षक राहुल शिरे, गजानन चांभारे, संतोष मदनकर, किशोर ठाकरे, शेषराव राऊत, सुनिल कुंवर, कमलेश गेहलोत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर