शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

नॉर्थ कॅनलच्या भिंती तुटल्या, उत्तर नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये दुर्गंधी

By मंगेश व्यवहारे | Updated: February 20, 2023 19:15 IST

डुकरांचा सुळसुळाट, विषारी जीवजंतूची भिती : जरा आमच्या भागाकडेही लक्ष द्या, स्थानिकांची प्रशासनाकडे मागणी

नागपूर : जी-२० च्या परिषदेसाठी शहरातील काही भागात सौंदर्यीकरणाचे काम लक्ष वेधून घेत आहे. पण या कामावरूनच शहरातील काही वस्त्यांनी प्रशासनाकडे बोट दाखविले आहे. उत्तर नागपुरातून जाणाऱ्या नॉर्थ कॅनेलच्या भिंती तुटल्या आहे. त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये दूर्गंधी पसरली आहे. डुकरांचा सुळसुळाट व विषारी जीवजंतूची भिती नागरीकांमध्ये आहे. त्यामुळे येथील नागरीकांनी जरा आमच्या भागाकडेही लक्ष द्या, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

उत्तर नागपुरातील प्रभाग क्रमांक ६ मधून गेलेला नॉर्थ कॅनलच्या भिंती विविध ठिकाणी तुटलेल्या आहे. भिंती तुटल्यामुळे प्रशासनाने तात्पुरते टीन लावून ठेवले आहे. तुटलेल्या भिंतीमुळे पंचशीलनगर, ताजनगर, खोब्रागडेनगर, आदर्शनगर, खंतेनगर, बंदेनवाजनगर वस्त्या दुर्गंधीने पीडित आहे. कॅनलमध्ये डुकरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट आहे. किटक, जीवजंतू , विषारी सापांमुळे काठावर राहणाऱ्यांच्या जीवाला हाणी होऊ शकते. भिंती तुटल्याने तातपुरते टीन लावले आहे. तुटलेल्या भिंतीमुळे रस्ता अरुंद झाला आहे. वाहन चालकांचे दूर्लक्ष झाल्यास वाहने नाल्यात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नॉर्थ कॅनलच्या भिंती बांधून लोकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे, अशी मागणी स्थानिक लोकांची आहे.

- आमच्या भागातही जी-२० अंतर्गत काम करानाल्याच्या भिंती दुरूस्त करून त्यावर सिवरेज ट्रीटमेंट प्लॅण्ट लावणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नाल्याच्या काठावर हॉकर्स झोन उपलब्ध करून, नाल्याच्या रस्त्याच्या कडेला गार्डन कॅरी तयार करून स्वच्छता व सुंदरता करणे गरजेचे आहे. जी-२० अंतर्गत महापालिका प्रशासनाने आपली नैतिक जबाबदारी समजून हे काम करण्याची गरज आहे. अथवा नॉर्थ कॅनल नावाने असलेल्या लेखा शिर्षाखाली अर्थसंकल्पात तरतूद करून यातून कामे करण्यात यावी. हॉकर्स झोन अंतर्गत जागा उपलब्ध केल्यास असंख्य लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, स्थानिक नागरीकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होईल.

जीतेंद्र घोडेस्वार, माजी नगरसेवक

टॅग्स :nagpurनागपूर