शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

वॉक फॉर संविधान : नागपुरात राष्ट्रीय एकता व एकात्मतेचे वॉकथॉन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:21 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट फेडरेशन व संविधान फाऊंडेशनच्या पुढाकाराने विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त सहभागातून ‘वॉक फॉर संविधान’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करून संविधान दिन अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. संविधान दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमी ते संविधान चौक या वॉकथॉनमध्ये शहरातील मुस्लिम बौद्ध, शीख, ख्रिश्चन, हिंदू अशा सर्व धर्माच्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन राष्ट्रीय एकता व एकात्मतेचे दर्शन घडविले. 

ठळक मुद्देसंविधान फाऊंडेशन व विद्यार्थ्यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट फेडरेशन व संविधान फाऊंडेशनच्या पुढाकाराने विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त सहभागातून ‘वॉक फॉर संविधान’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करून संविधान दिन अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. संविधान दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमी ते संविधान चौक या वॉकथॉनमध्ये शहरातील मुस्लिम बौद्ध, शीख, ख्रिश्चन, हिंदू अशा सर्व धर्माच्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन राष्ट्रीय एकता व एकात्मतेचे दर्शन घडविले. 

दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला शालेय विद्यार्थ्याच्या हस्ते मालार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे, आयपीएस अधिकारी संदीप तामगाडगे, डॉ. सिद्धार्थ गायकवाड, संविधान फाऊंडेशनच्या रेखा खोब्रागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वॉकथॉन’ला प्रारंभ करण्यात आले. हजारो नागरिकांचा सहभाग असलेल्या वॉकथॉनमधील संविधानाच्या जयघोषाने अवघे नागपूर दुमदुमले. 
वॉकथॉन संविधान चौकात पोहोचल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. महिला संघटनांच्या कार्यकर्त्यांनी संविधानाचा जागर करणाऱ्या गीतांचे गायन केले. राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. ‘वॉक फॉर संविधान’मध्ये शेकडो नागरिकांच्या हाती तिरंगा ध्वज होते. सर्वांच्या हाती संविधानावरील स्लोगन लिहिलेले विविध फलक लक्ष वेधून घेत होते. 
‘वॉक फॉर संविधान’मध्ये विविध समाजाचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. यात पोवार समाज संघटनेचे मोतिराम चौधरी, मराठा सेवा संघाचे प्रमोद वैद्य, पंकज निंबाळकर, महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमचे टी. बी. देवतळे (निवृत्त पोलीस अधीक्षक), शिवदास वासे, राजरतन कुंभारे, डॉ. जयराम खोब्रागडे, मिलिंद बन्सोड, संभाजी ब्रिगेडचे अमोल वाकुडकर, प्रशांत शेंडे, समीर जाधव, अभिजित दळवी, पिंटू मुनिश्वर, संविधान फाऊंडेशनचे दीपक निरंजन, नेहा खोब्रागडे, जिजाऊ ब्रिगेडच्या स्वाती शेंडे, सुनीता जिचकार, कुणबी महासंघाचे खडसे, कोहळे, विजय शेंडे, प्रा. शशिकांत डांगे, विजय बेले, शिरीष कांबळे, अल्का निरंजन, नमा खोब्रागडे, जागृत नागरिक मंचाचे रामभाऊ आंबुलकर यांच्यासह विविध सामाजिक संघघनांचे प्रतिनिधी, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते, सर्व धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते. 
संचालन प्रा. महेंद्रकुमार मेश्राम यांनी केले तर अतुल खोब्रागडे यांनी प्रास्ताविक-भूमिका विशद केली.पोलीस बँड पथकाने वेधले लक्ष 
या वॉकथॉनच्या समारोपप्रसंगी संविधान चौकात पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीतासह विविध गीतांच्या धून सादर करीत लोकांचे लक्ष वेधून घेतले. पोलीस बँडवर देशभक्तीपर गीतांची धून सादर करण्यात आली.

 

टॅग्स :Constitution Dayसंविधान दिनMorchaमोर्चा