नागपुरात व्हेंटिलेटरसाठी वेटिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 12:35 AM2020-09-09T00:35:40+5:302020-09-09T00:37:10+5:30

मेयो व मेडिकल व खासगी कोविड हॉस्पिटल मिळून साधारण २,७००वर खाटा आहेत. त्या तुलनेत २९१ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. परंतु मंगळवारी सायंकाळी महापालिकेच्या हेल्पलाईन नंबरवर मदत मागितल्यावर व्हेंटिलेटर असलेली एकही खाट उपलब्ध नसल्याचे उत्तर मिळाले.

Waiting for ventilator in Nagpur! | नागपुरात व्हेंटिलेटरसाठी वेटिंग!

नागपुरात व्हेंटिलेटरसाठी वेटिंग!

Next
ठळक मुद्दे२,७०० खाटा, २९१ व्हेंटिलटर : मेयो, मेडिकलसह, खासगी कोविड हॉस्पिटल फुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेयो व मेडिकल व खासगी कोविड हॉस्पिटल मिळून साधारण २,७००वर खाटा आहेत. त्या तुलनेत २९१ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. परंतु मंगळवारी सायंकाळी महापालिकेच्या हेल्पलाईन नंबरवर मदत मागितल्यावर व्हेंटिलेटर असलेली एकही खाट उपलब्ध नसल्याचे उत्तर मिळाले. विशेष म्हणजे, रुग्णांची मृत्यूसंख्या कमी करण्यासाठी प्रशासनाने आज महत्त्वपूर्ण बैठक घेतली. परंतु व्हेंटिलेटरची उपलब्धता, त्यातील तज्ज्ञ यावर चर्चा के ली नसल्याचे, एका अधिकाऱ्याने सांगितले. कोरोनाच्या मध्यम व गंभीर रुग्णांसाठी अपुऱ्या खाटा, सोयीसुविधा आणि आता व्हेंटिलेटरच्या तुटवड्याची भर पडली आहे. नागपूर जिल्ह्यात मेयो व मेडिकल मिळून १,२०० खाटांचे कोविड हॉस्पिटल आहेत. यात प्रत्येकी २०० खाटा आयसीयू म्हणजे अतिदक्षता विभागाच्या आहेत. मेडिकलमध्ये ८७ तर मेयोमध्ये ८५ व्हेंटिलेटर आहेत. महापालिका प्रशासन शहरात ३० वर खासगी कोविड हॉस्पिटल सुरू असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात २२ हॉस्पिटलच रुग्णसेवेत आहेत. येथे किती खाटा आहेत, हा संशोधनाचा भाग आहे. सर्व खासगी हॉस्पिटल मिळून सुमारे ११९ व्हेंटिलेटर आहेत. आज सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास महापालिके च्या हेल्पलाईन नंबरवर संपर्कसाधला असता, व्हेंटिलेटर कुठेच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. तेथील कर्मचाऱ्यांनी हेही सांगितले, खासगी रुग्णालयात त्यांचे स्वत:चेच रुग्ण गंभीर असतात. एखाद-दोन व्हेंटिलेटर रिकामे असले तरी ऐनवेळी त्यांच्याच रुग्णांना त्याची गरज पडत असल्याने त्यांना विचारणा के ल्यावर ते नकार देत असल्याचेही, त्यांनी सांगितले.

मेयो, मेडिकलमधील काही व्हेंटिलेटर नादुरुस्त
मनपाच्या डॅशबोर्डवर मेयोमध्ये ८५ तर मेडिकलमध्ये ८७ व्हेंटिलेटर असल्याचे दाखवीत असले तरी किती दुरुस्त आणि किती नादुरुस्त याची नोंद नाही. सूत्रानुसार, या दोन्ही रुग्णालयांतील यातील १० ते १५ व्हेंटिलेटर नादुरुस्त आहेत. धक्कादायक म्हणजे, व्हेंटिलेटर लावण्यासाठी तज्ज्ञाची गरज असते. परंतु पुरेसे मनुष्यबळ नसल्याने अनेक वेळा व्हेंटिलेटर लावण्यासाठी रुग्णांवर जीवघेण्या प्रतीक्षेची वेळ येत असल्याची माहिती आहे.

रात्री ७ वाजताच खासगी हॉस्पिटल होतात बंद
जिल्हा माहिती कक्षानुसार ६,३३९ रुग्ण होम आयसोलेशन म्हणजे, गृह अलगीकरण कक्षात आहेत, तर कोविड केअर सेंटरमध्ये सुमारे १५०० वर रुग्ण दाखल आहेत. या रुग्णांना कधीही आॅक्सिजन बेडची गरज पडू शकते. परंतु शहरात रात्री ७ वाजल्यानंतर खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णच घेत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही हॉस्पिटलला याबाबत विचारले असता, रात्री तज्ज्ञ डॉक्टर राहत नसल्याने रुग्ण घेत नसल्याचे सांगितले.

मनपानुसार रुग्णालयातील व्हेंटिलेटरची स्थिती
मेडिकल ८७ ,मेयो ८५,लता मंगेशकर १०,वोक्हार्ट ८,सेव्हन स्टार १०,किंगज्वे ४,अ‍ॅलेक्सिस ७,के अर ७,व्हिनस ५,सुश्रुत ५,आयुष्यमान २,रामदेवबाबा हॉस्पिटल २,शुअरटेक २,विवेका २,सीम्स ५,राधाकृष्ण ३,गंगा केअर ७,कुणाल ९,भवानी ८,सेंट्रल २,रेडिएन्स ११,शालिनीताई मेघे १०

Web Title: Waiting for ventilator in Nagpur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.