शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

नागपूर विभागातील शाळांना उघडण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 21:19 IST

केंद्रीय गृहमंत्रालयाने दोन दिवसापूर्वी नववी ते बारावीच्या वर्गांना मुभा देण्याची घोषणा केली. यानंतर नागपूर विभागातील २ हजार ७४१ माध्यमिक शाळा आणि १ हजार ५७९ कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आता शाळा उघडण्याची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देराज्य शासनाच्या सूचनांकडे लक्ष : नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय गृहमंत्रालयाने दोन दिवसापूर्वी नववी ते बारावीच्या वर्गांना मुभा देण्याची घोषणा केली. यानंतर नागपूर विभागातील २ हजार ७४१ माध्यमिक शाळा आणि १ हजार ५७९ कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आता शाळा उघडण्याची प्रतीक्षा आहे.मार्च महिन्यापासून देशात लॉकडाऊन झाल्यानंतर नागपूर विभागातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. मागील पाच महिन्यापासून शैक्षणिक संस्था बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसोय होऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षणाची पद्धत शाळांनी आणि संस्थांनी अवलंबली आहे. परंतु त्यामध्ये बऱ्याच मर्यादा असल्याचे पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे मत आहे. आठवी ते नववीच्या वर्गातील विद्यार्थी समंजस असल्याने वैयक्तिक स्वच्छतेबाबत आणि आरोग्याबाबत काळजी घेऊ शकतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय उघडली जावी, अशी मागणी यापूर्वी काही संस्था आणि पालकांकडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आणि अनलॉक- ४च्या प्रक्रियेमध्ये २१ सप्टेंबर पासून नववी ते बारावीच्या वर्गांना मुभा देण्याची घोषणा केली आहे. मात्र पालकांचे संमती पत्र आणल्यानंतरच या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जावा, असेही ही केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे.नागपूर विभागामध्ये १ हजार ५७९ कनिष्ठ महाविद्यालये आहेत तर २ हजार ७४१ माध्यमिक शाळा आहेत. यादृष्टीने विचार करता नववी ते बारावीचे वर्ग सुरू होण्याची अपेक्षा या निर्णयामुळे आता व्यक्त होत आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या १४ माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये असून या विद्यार्थ्यांनादेखील शाळा उघडण्याची प्रतीक्षा लागली आहे. यासंदर्भात अद्याप राज्य सरकारने घोषणा केली नसली तरी, भविष्यात शाळा उघडणार हे लक्षात घेऊन शाळांनी आणि खाजगी संस्थांच्या शाळांनी तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालयाशी संपर्क साधला असता, अद्याप राज्य सरकारकडून या संदर्भात कसल्याही सूचना आल्या नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Schoolशाळाnagpurनागपूर