शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात आचारसंहिता शिथिल होण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:52 IST

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिकेच्या विकास कामांना ब्रेक लागले आहेत. पहिल्या टप्प्यात नागपूरसह विदर्भातील सात जागांसाठी गुरुवारी मतदान झाले. २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. म्हणजेच आचारसंहिता संपण्यासाठी ४० दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यास विकास कामे ठप्पच राहणार आहेत. याचा विचार करता मतदान होताच आचारसंहिता शिथिल होण्याची प्रतीक्षा महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांना लागली आहे.

ठळक मुद्देशहरातील विकास कामांवर मर्यादा : पाणीपुरवठा योजनांनाही फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिकेच्या विकास कामांना ब्रेक लागले आहेत. पहिल्या टप्प्यात नागपूरसह विदर्भातील सात जागांसाठी गुरुवारी मतदान झाले. २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. म्हणजेच आचारसंहिता संपण्यासाठी ४० दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यास विकास कामे ठप्पच राहणार आहेत. याचा विचार करता मतदान होताच आचारसंहिता शिथिल होण्याची प्रतीक्षा महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांना लागली आहे.मतदान संपल्यानंतर आचारसंहिता शिथिल होऊ शकते. यामुळे महापालिकेत तशी चर्चा आहे. मात्र अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत कोणत्याही स्वरुपाचे पत्र महापालिका प्रशासनाला मिळालेले नाही. यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे.आचारसंहितेमुळे अमृत योजना, ई-लायब्ररी, रस्ते व निविदा मंजुरी, अनुकंपावरील नियुक्त्या यासह विकास योजनांचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. आचारसंहितेमुळे स्थायी समितीच्या बैठकी बंद आहेत. सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. एखादा प्रस्ताव तातडीने मंजूर करावयाचा असला तरी यासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. १० मार्चला निवडणूक आचारसंहिता लागली. लोक सभा निवडणुका सात टप्प्यात होणार आहे. देशातील सर्व भागातील मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर मतमोजणी होईल. त्यानंतर आचार संहिता संपणार असल्याने विकास कामांच्या फाईल मंजुरीचा मार्ग मोकळा होणार आहे.मतदान संपल्यानंतर आचारसंहिता शिथिल करता येते. याबाबतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. स्थानिक स्तरावरील विकास कामांचा प्रस्ताव मंजूर करणे गरजेचे आहे. याचा राज्यातील वा देशातील अन्य भागातील मतदानावर कोणताही प्रभाव पडणार नसल्यास अशा प्रस्तावाला मंजुरी देता येते.शहरालगतच्या भागात पाणीपुरवठा योजना नाही. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. अमृत योजनेच्या माध्यमातून या भागात नळाचे नेटवर्क टाकले जाणार आहे. मात्र आचारसंहितेमुळे काम प्रलंबित आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी कर्मचाºयांच्या वारसांना महापालिकेत अनुकंपावर नियुक्ती करण्याबाबतची फाईल तयार करण्यात आली होती. संबंधित वारसांची पोलिसांनी पडताळणीही केली आहे. मात्र आचारसंहितेमुळे फाईलला ब्रेक लागले आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर