शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

६७ वे विदर्भ साहित्य संमेलन पुढे ढकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 11:33 IST

विदर्भ साहित्य संघातर्फे १४ मार्चपासून हिंगणा येथे सुरू होणारे ६७ वे विदर्भ साहित्य संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय वि.सा. संघाने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूचा धसका साहित्य जगतानेही घेतला आहे. विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता विदर्भ साहित्य संघातर्फे १४ मार्चपासून हिंगणा येथे सुरू होणारे ६७ वे विदर्भ साहित्य संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय वि.सा. संघाने घेतला आहे. आयोजन समितीच्या शुभदा फडणवीस यांनी गुरुवारी हा निर्णय जाहीर केला.कोरोना विषाणूचा जगभरात वाढता प्रभाव व वाढती मृतांची आकडेवारी यामुळे पाहता युनोने या आजाराला महामारी म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्रातही या विषाणूचा फैलाव वेगाने होत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. पुणे, मुंबईनंतर नागपुरातही कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण आढळून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विषाणूचा राज्यात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने राज्यातील सर्व शासकीय आणि सार्वजनिक सोहळे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.विशेष म्हणजे १४ व १५ मार्च रोजी हिंगण्यातील संत गाडगे महाराज महाविद्यालयाच्या परिसरात ६७ वे विदर्भ साहित्य संमेलन होऊ घातले होते. बसवेश्वर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुधाकर मोगलेवार यांनी स्थापन केलेल्या या संस्थेत साहित्य संमेलन होणार असल्याने हिंगणावासी आनंदात होते. संमेलनाची तयारीही अंतिम टप्पात आली होती. पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. मात्र राज्यासह नागपुरातही कोरोना संशयित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर साहित्य रसिक आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिने हे साहित्य संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय आयोजन समितीचे जाहीर केला. विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आकस्मिक बैठक बोलावून हा निर्णय जाहीर केला. मात्र संमेलनामुळे हिंगणावासीयांच्या आनंदावर विरजण पडू दिले जाणार नसून त्यांचा उत्साह बघता महिनाभरानंतर हे संमेलन येथेच होईल अशी माहिती शुभदा फडणवीस यांनी दिली. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता हा संमेलन पुढे ढकलणे संयुक्तिक राहील, असे मत संयोजक डॉ. गणेश चव्हाण यांनी व्यक्त केले. या पत्रपरिषदेला वि. सा. संघाचे कार्याध्यक्ष वामन तेलंग, सरचिटणीस विलास मानेकर, संचालक उदय मोगलेवार, प्राचार्य आरती मोगलेवार, डॉ. गणेश मायवाडे, डॉ. संजय ढोक व डॉ. अनिल चरडे उपस्थित होते.

 

टॅग्स :literatureसाहित्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस