शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

व्हीएनआयटीचा ‘टॉप’ विद्यापीठात समावेश व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:13 IST

व्हीएनआयटीने आज देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविला आहे. संस्थेच्या प्रगतीवर विश्वास आहे.

ठळक मुद्देविश्राम जामदार यांचे प्रतिपादन : व्हीएनआयटीचा दीक्षांत समारंभ थाटात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्हीएनआयटीने आज देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविला आहे. संस्थेच्या प्रगतीवर विश्वास आहे. परंतु अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. व्हीएनआयटीने जगातील १०० प्रमुख विद्यापीठात स्थान मिळविणे हे आमचे ध्येय असून त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नालॉजीचे चेअरमन विश्राम जामदार यांनी केले.शुक्रवारी विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थेच्या (व्हीएनआयटी) १५ व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संचालक डॉ. नरेंद्र चौधरी, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते. विश्राम जामदार म्हणाले, भारत सरकारने देशातील २० जागतिक दर्जाचे विद्यापीठ साकारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. व्हीएनआयटीला या संधीचा फायदा घेण्याची गरज आहे. त्यासाठी विद्यार्थ्यानी संशोधनावर भर देण्याची गरज आहे. व्हीएनआयटीला टॉप रँंकिंगमध्ये आणण्याची जबाबदारी सर्वांची आहे. ते आव्हान म्हणून स्वीकारण्याची गरज आहे. प्राध्यापकांप्रमाणेच विद्यार्थ्यांनीही आपली जबाबदारी ओळखावी. उत्तर अमेरिकेच्या दौºयावर असताना तीन विद्यापीठांना भेट दिली. त्यात व्हीएनआयटीने इलनाईस इन्स्टिट्यूूट आॅफ टेक्नॉलॉजी या संस्थेशी शैक्षणिक करार केला असून दोन विद्यापीठांसोबत बोलणी सुरू आहे. समारंभात संचालक डॉ. नरेंद्र चौधरी यांनी संस्थेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. समारंभात एकूण ११२९ विद्यार्थ्यांना पदवीने सन्मानित करण्यात आले.सुयश निलावारला डॉ. विश्वेश्वरय्या पदकदीक्षांत समारंभात संस्थेच्या सर्व विभागांमधून सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाºया बी. टेक मेकॅनिकल अभ्यासक्रमातील सुयश निलावार याला ९.८४ सीजीपीए मिळाल्याबद्दल डॉ. विश्वेश्वरय्या पदकाने सन्मानित करण्यात आले तर बी. टेक. सिव्हील अभ्यासक्रमातील अर्चना व्ही. हिला ९.२९ सीजीपीए मिळविल्याबद्दल सर्वाधिक पदकांनी सन्मानित करण्यात आले.डॉ. कस्तुरीरंगन यांचा संदेशइस्रोचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. कस्तुरीरंगन यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या संदेशाचे यावेळी वाचन करण्यात आले. आपल्या संदेशात त्यांनी विद्यार्थ्यांना संशोधक होण्याचे आवाहन केले. जगाच्या इतर देशाच्या तुलनेत भारतात संशोधनाची गती अतिशय कमी आहे. भारतात चांगले इंजिनिअर घडत आहेत. परंतु त्यांच्यात संशोधकांची कमतरता आहे. शिक्षणासोबत संशोधक तयार होतील, अशी शिक्षण पद्धती तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले.