शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन परंपरेला ‘व्हीएनआयटी’ चा छेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 23:30 IST

दीक्षांत समारंभ म्हटले की डोळ््यासमोर येतात ते काळी ‘कॅप’ व काळा ‘गाऊन’ घेऊन पदवी हाती घेतलेले विद्यार्थी. ब्रिटिशांच्या काळापासून बहुतांश ठिकाणी पदवीदान करताना असाच पोशाख असतो. मात्र ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) सोळाव्या दीक्षांत समारंभादरम्यान या परंपरेला छेद देण्यात येणार आहे. ‘कॅप’ व ‘गाऊन’चा ‘ड्रेसकोड’ यंदापासून बंद करण्याचा निर्णय ‘व्हीएनआयटी’च्या प्रशासकीय परिषदेने घेतला आहे. अशा प्रकारचे पाऊल उचलणारे हे देशातील पहिले ‘एनआयटी’ ठरले आहे.

ठळक मुद्देयंदाचा दीक्षांत समारंभ ऐतिहासिक ठरणार : ‘कॅप’ व ‘गाऊन’चा ‘ड्रेसकोड’ बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दीक्षांत समारंभ म्हटले की डोळ््यासमोर येतात ते काळी ‘कॅप’ व काळा ‘गाऊन’ घेऊन पदवी हाती घेतलेले विद्यार्थी. ब्रिटिशांच्या काळापासून बहुतांश ठिकाणी पदवीदान करताना असाच पोशाख असतो. मात्र ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) सोळाव्या दीक्षांत समारंभादरम्यान या परंपरेला छेद देण्यात येणार आहे. ‘कॅप’ व ‘गाऊन’चा ‘ड्रेसकोड’ यंदापासून बंद करण्याचा निर्णय ‘व्हीएनआयटी’च्या प्रशासकीय परिषदेने घेतला आहे. अशा प्रकारचे पाऊल उचलणारे हे देशातील पहिले ‘एनआयटी’ ठरले आहे.‘व्हीएनआयटी’चा सोळावा दीक्षांत समारंभ अभियंता दिन म्हणजेच १५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. यंदाचा दीक्षांत समारंभ वेगळा ठरावा असा प्रशासनाचा मानस होता. ‘ड्रेसकोड’बाबत सुमारे ६०० विद्यार्थ्यांना वैयक्तिकपणे विचारणा करण्यात आली. विद्यार्थ्यांनी ब्रिटिशकालीन ‘ड्रेसकोड’ नको, अशी भावना व्यक्त केली. त्यानंतर वरील प्रस्ताव ‘व्हीएनआयटी’च्या विधिसभेसमोर मांडण्यात आला. विधीसभेच्या मंजुरीनंतर यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. यंदा विद्यार्थ्यांना ‘कॅप’ व ‘गाऊन’ घालून येण्याची गरज नाही. ते केवळ पांढरा शर्ट व काळी पॅन्ट किंवा पांढरा सलवार-साडी या पोशाखात येऊ शकतात, असे ‘व्हीएनआयटी’च्या प्रशासकीय परिषदेचे अध्यक्ष विश्राम जामदार यांनी सांगितले.केंद्र शासनाशी निर्णयाचा संबंध नाहीकाही लोक आमच्या या निर्णयावर नाराजी दाखवू शकतात. मात्र विद्यार्थ्यांच्या संमतीनंतरच आम्ही हा निर्णय घेतला आहे. स्वतंत्र भारतात ब्रिटिशांची परंपरा किती काळ चालणार असा सवाल जामदार यांनी केला. संबंधित निर्णय आमच्या विधिसभेचा आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाशी याचा काहीही संबंध नाही, असे संचालक डॉ.प्रमोद पडोळे यांनी स्पष्ट केले.पुढील वर्षीपासून पारंपरिक पोशाख‘व्हीएनआयटी’मध्ये देशातील विविध भागांतून विद्यार्थी शिकायला येतात. त्यामुळे पुढील वर्षीच्या दीक्षांत समारंभापासून विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या भागातील परंपरेनुसार पारंपरिक पोशाख घालून येण्याची परवानगी देण्यात येईल, अशी माहिती संचालक डॉ.प्रमोद पडोळे यांनी दिली.यंदा सर्वाधिक ‘पीएचडी’‘व्हीएनआयटी’च्या सोळाव्या दीक्षांत समारंभात ७७ विद्यार्थ्यांना ‘पीएचडी’ प्रदान करण्यात येणार आहे. आतापर्यंतच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आकडा आहे. सोबतच ३०७ विद्यार्थ्यांना ‘एमटेक’, ५५ जणांना ‘एमएस्सी’, तर ६७२ विद्यार्थ्यांना ‘बी.टेक.’पदवी प्रदान करण्यात येईल. ५७ जणांना ‘बीआर्क’ ही पदवी देण्यात येईल. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून ‘टाटा केमिकल्स’चे व्यवस्थापकीय संचालक व ‘सीईओ’ रामकृष्णन मुकुंदन हे उपस्थित राहणार आहेत. पत्रपरिषदेला कुलसचिव डॉ.शैलेश साठे व अधिष्ठाता (अ‍ॅकेडेमिक्स) डॉ.एस.बी.ठोंबरे हेदेखील उपस्थित होते.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय