शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हीएनआयटी’चा दीक्षांत समारंभ ठरला ऐतिहासिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 22:12 IST

देशाच्या अभियांत्रिकी क्षेत्राला अनोखी उंची प्रदान करणारे सर एम.विश्वेश्वरय्या यांच्या नावावर असलेल्या ‘व्हीएनआयटी’चा (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १६ वा दीक्षांत समारंभ ऐतिहासिक ठरला. अभियंता दिनीच झालेल्या या समारंभात ब्रिटिशकालीन परंपरा हद्दपार करण्यात आली. ‘कॅप’ व ‘गाऊन’विना हा सोहळा पार पडला व विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनीदेखील याचे स्वागत केले. अशा प्रकारचे पाऊल उचलणारे हे देशातील पहिले ‘एनआयटी’ ठरले आहे.

ठळक मुद्दे‘कॅप’ व ‘गाऊन’विना झाला सोहळा : ब्रिटिशकालीन परंपरा हद्दपार

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशाच्या अभियांत्रिकी क्षेत्राला अनोखी उंची प्रदान करणारे सर एम.विश्वेश्वरय्या यांच्या नावावर असलेल्या ‘व्हीएनआयटी’चा (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १६ वा दीक्षांत समारंभ ऐतिहासिक ठरला. अभियंता दिनीच झालेल्या या समारंभात ब्रिटिशकालीन परंपरा हद्दपार करण्यात आली. ‘कॅप’ व ‘गाऊन’विना हा सोहळा पार पडला व विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनीदेखील याचे स्वागत केले. अशा प्रकारचे पाऊल उचलणारे हे देशातील पहिले ‘एनआयटी’ ठरले आहे.‘व्हीएनआयटी’ची स्थापना १९६० साली झाली व त्यावेळी संस्थेचे नाव ‘व्हीआरसीई’ होते. २००२ साली संस्थेला ‘एनआयटी’चा दर्जा देण्यात आला. सद्यस्थितीत ‘एनआयआरएफ’नुसार ‘व्हीएनआयटी’चा देशातील सर्वोत्कृष्ट संस्थांमध्ये ३१ वा क्रमांक आहे. ‘ड्रेसकोड’बाबत सुमारे ६०० विद्यार्थ्यांना वैयक्तिकपणे विचारणा करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी ब्रिटिशकालीन ‘ड्रेसकोड’ नको, अशी भावना व्यक्त केली. त्यानंतर वरील प्रस्ताव ‘व्हीएनआयटी’च्या विधीसभेसमोर मांडण्यात आला. विधीसभेच्या मंजुरीनंतर यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. शनिवारी झालेल्या ‘व्हीएनआयटी’च्या दीक्षांत समारंभाला ‘टाटा केमिकल्स’चे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ आर.मुकुंदन, प्रशासकीय परिषदेचे अध्यक्ष विश्राम जामदार, संचालक डॉ.प्रमोद पडोळे प्रामुख्याने उपस्थित होते. संपूर्ण समारंभात कुठेही ‘कॅप’ व ‘गाऊन’चा वापर दिसून आला नाही. सर्व विद्यार्थी पांढरा शर्ट व काळी पॅन्ट किंवा पांढरा सलवार-साडी या पोशाखात आले होते.

टॅग्स :Studentविद्यार्थीnagpurनागपूर