शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांची दीक्षाभूमीला भेट; विकास कामांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 21:55 IST

महाराष्ट्र राज्य महापौर परिषदेच्या निमित्ताने नागपुरात आलेल्या विविध १९ शहरातील महापौरांनी शनिवारी दीक्षाभूमीला भेट दिली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांना अभिवादन केले. देशातील सर्वात मोठा स्तूप म्हणून ख्याती असलेल्या दीक्षाभूमीबाबत विस्तृत माहिती यावेळी जाणून घेतली. तसेच शहरातील विविध स्थळांना भेट देऊन शहरातील विकास कामांची माहिती जाणून घेतली.

ठळक मुद्देसुरेश भट सभागृह, विवेकानंद स्मारकाची माहिती घेतली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य महापौर परिषदेच्या निमित्ताने नागपुरात आलेल्या विविध १९ शहरातील महापौरांनी शनिवारी दीक्षाभूमीला भेट दिली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांना अभिवादन केले. देशातील सर्वात मोठा स्तूप म्हणून ख्याती असलेल्या दीक्षाभूमीबाबत विस्तृत माहिती यावेळी जाणून घेतली. तसेच शहरातील विविध स्थळांना भेट देऊन शहरातील विकास कामांची माहिती जाणून घेतली.नागपूरवासीयांसाठी प्रेरणास्थळ असलेल्या व शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या स्वामी विवेकानंद स्मारकाला भेट देऊन याबद्दलची माहिती महापौरांनी जाणून घेतली. नागपूर शहरात स्वनियंत्रण प्रणालीद्वारे नागरिकांची सुरक्षा राखणाऱ्या मनपा मुख्यालयातील ‘सिटी आॅपरेशन सेंटर’ला यावेळी महापौरांनी भेट दिली. शहरात विविध ठिकाणी सिग्नलवर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे शहरात राखली जाणारी सुरक्षा, वेळीच गरजूंना केली जाणारी मदत व नैसर्गिक आपत्तीच्यावेळी करण्यात आलेल्या सुरक्षेची संपूर्ण माहिती व्हीडीओच्या माध्यमातून नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवने यांनी यावेळी दिली.यानंतर सर्व मान्यवरांनी देशातील सर्वात मोठे सांस्कृतिक सभागृह म्हणून नावारुपास आलेल्या रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहाला भेट दिली. नागपूर महानगरपालिकेचे मुख्य अभियंता मनोज तालेवार यांनी सभागृहातील वैशिष्ट्यांची विस्तृत माहिती दिली१९ महापौरांची उपस्थितीनागपुरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र महापौर परिषदेला राज्यातील १९ महापौरांनी उपस्थिती दर्शविली व शहरातील विविध विकास कामांची पाहणी केली. परिषदेचे अध्यक्ष व बृहन्मुंबई महानगरपालिकेचे महापौर प्राचार्य विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह पनवेलच्या महापौर कविता चौतमोल, मीरा भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता, सांगली मिरज कूपवाडच्या महापौर संगीता खोत, चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर, अमरावतीचे महापौर संजय नरवणे, लातूरचे महापौर सुरेश पवार, सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, मालेगावचे महापौर शेख रशीद शेख शफी, भिवंडी निजामपूरचे महापौर जावेद गुलाम मोहम्मद दळवी, नाशिकच्या महापौर रंजना भानसी, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, परभणीच्या महापौर मीना बरपूडकर, जळगावच्या महापौर सीमा भोळे, कोल्हापूरच्या महापौर शोभा बोंदे, वसई विरारचे महापौर रूपेश सुदाम जाधव, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, अकोल्याचे महापौर विजय अग्रवाल प्रामुख्याने परिषदेला उपस्थित होते. .

टॅग्स :MayorमहापौरDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी