शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

 इराणच्या महिलेची घडविली पतीसोबत भेट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 20:40 IST

मुंबई-हावडा मेल नागपुर रेल्वेस्थानकावर आल्यावर एक विदेशी महिला गाडीखाली उतरली. ती दुसऱ्या प्लॅटफार्मवर गेल्यामुळे गाडी निघुन गेली. महिला रडु लागली. परंतु रेल्वे सुरक्षा दलाने तिची सांत्वना करुन तिची पतीसोबत भेट करून दिल्याची घटना सोमवारी नागपूर रेल्वेस्थानकावर घडली.

ठळक मुद्देआरपीएफची कामगिरी : मुंबई-हावडा मेलमधुन झाली होती ताटातुट

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई-हावडा मेल नागपुर रेल्वेस्थानकावर आल्यावर एक विदेशी महिला गाडीखाली उतरली. ती दुसऱ्या प्लॅटफार्मवर गेल्यामुळे गाडी निघुन गेली. महिला रडु लागली. परंतु रेल्वे सुरक्षा दलाने तिची सांत्वना करुन तिची पतीसोबत भेट करून दिल्याची घटना सोमवारी नागपूर रेल्वेस्थानकावर घडली.सोमवारी सकाळी ११.२० वाजता रेल्वेगाडी क्रमांक १२८०९ मुंबई-हावडा मेल नागपूर रेल्वेस्थानकावर आली. या गाडीतून एक विदेशी महिला खाली उतरली. चुकीने ती दुसऱ्या प्लॅटफार्मवर गेली. तोपर्यंत गाडी पुढील प्रवासाला निघुन गेली होती. ती फक्त पर्शियन भाषा बोलु शकत असल्यामुळे ती आपली आपबिती कोणाला सांगु शकत नव्हती. ती रडत असल्याचे समजल्यानंतर स्टेशन उपव्यवस्थापक दत्तुजी गाडगे, राजु इंगळे, प्रवासी सुविधा पर्यवेक्षक प्रविण रोकडे यांनी याबाबत आरपीएफला सुचना दिली. आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा, निरीक्षक विरेंद्र वानखेडे यांनी उपनिरीक्षक होती लाल मिना, सहायक उपनिरीक्षक अभय बेदरकर यांना उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयात पाठविले. तेथे त्या महिलेला फक्त पर्शियन भाषा येत असल्याचे समजले. त्यामुळे मीना यांनी मोबाईलवर ट्रान्सलेटर अ‍ॅप डाऊनलोड करून महिलेशी संवाद साधला. त्यानंतर तिने आपबिती सांगितली. तिची हकीकत जाणून घेतल्यानंतर आरपीएफने नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून रेल्वेगाडीतील सीटीआय हरिक्रिष्णन यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी महिलेच्या एस २ कोचमध्ये बसलेल्या पतीला भंडारा स्थानकावर उतरविले. तिचा पती तहेरियान मिर्झा बेकी (४७) हा नागपुरात आल्यानंतर महिलेच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. त्यानंतर पती-पत्नीने आरपीएफचे आभार मानुन आपल्या पुढील प्रवासाला सुरुवात केली.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरPoliceपोलिस