शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विश्वास पाठक भाजपाचे प्रदेश माध्यम प्रमुखपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 19:47 IST

भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश प्रवक्ते व विविध विषयांचे अभ्यासू विश्वास पाठक यांची आज भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश माध्यम प्रमुखपदी निवड करण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी घोषित केलेल्या प्रदेश भाजपाच्या कार्यकारिणीत ही निवड करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश प्रवक्ते व विविध विषयांचे अभ्यासू विश्वास पाठक यांची आज भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश माध्यम प्रमुखपदी निवड करण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी घोषित केलेल्या प्रदेश भाजपाच्या कार्यकारिणीत ही निवड करण्यात आली.

विश्वास पाठक हे गेल्या सुमारे 5 वर्षांपासून भाजपाचे प्रदेश प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळीत होते. या दरम्यान त्यांनी इंग्रजी, मराठी आणि हिंदी इलेक्ट्रॉनिक चॅनेलच्या माध्यमातून केलेल्या चर्चेतून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची आणि भाजपाची धोरणे आणि भूमिका जनतेसमोर यशस्वीपणे मांडली आहेत. तसेच प्रिंट मीडियामध्ये अनेक विषयावर लेखन करून त्यांनी आपले स्पष्ट आणि सडेतोड विचार मांडले आहेत. महाराष्ट्र आणि देशातील इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये विविध विषयांवरील अभ्यासू चर्चापटू म्हणून ओळखले जातात.

तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासनात त्यांनी ऊर्जा विभागात विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला आहे. या काळात त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन ऊर्जा विभागाला एका विशिष्ट उंचीवर नेऊन बसवले. तसेच १८ दिवसात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत त्यांनी प्रत्येक जिल्हास्थानी ऊर्जा विभागाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोचाव्या म्हणून पत्रपरिषदा घेऊन पत्रकारांशी संवाद साधला आहे. यामुळे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच पत्रकारांशी त्यांचा जनसंपर्क आहे. ऊर्जा विभागापूर्वी नागपूरच्या दैनिक तरुण भारतमध्ये प्रबंध संचालक म्हणून ५ वर्षे त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. विविध वर्तमानपत्रांमध्ये आतापर्यंत ४०० वर लेख प्रसिध्द झाले आहेत.

या नियुक्तीबद्दल पाठक यांनी माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले आहे.

 

 

 

 

टॅग्स :BJPभाजपा