सखदेव, पुनसे, मोहोड यांना विसा संघाचे पुरस्कार जाहीर; ‘लोकमत’चे प्रवीण खापरे यांना अग्रवाल स्मृती वार्तांकन पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2022 07:13 PM2022-12-21T19:13:42+5:302022-12-21T19:14:30+5:30

Nagpur News विदर्भ साहित्य संघाच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा विदर्भ साहित्य संघाच्या शंभराव्या वर्धापनदिनी १४ जानेवारी २०२३ रोजी पार पडणार आहे.

VISA Sangh awards announced to Sakhdev, Punse, Mohod; Agarwal Smriti Journalism Award to Praveen Khapre of Lokmat | सखदेव, पुनसे, मोहोड यांना विसा संघाचे पुरस्कार जाहीर; ‘लोकमत’चे प्रवीण खापरे यांना अग्रवाल स्मृती वार्तांकन पुरस्कार

सखदेव, पुनसे, मोहोड यांना विसा संघाचे पुरस्कार जाहीर; ‘लोकमत’चे प्रवीण खापरे यांना अग्रवाल स्मृती वार्तांकन पुरस्कार

Next

 

नागपूर : विदर्भ साहित्य संघाच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा विदर्भ साहित्य संघाच्या शंभराव्या वर्धापनदिनी १४ जानेवारी २०२३ रोजी पार पडणार आहे.

या पुरस्कारांमध्ये पुरस्कार ‘इथे जिंकला बाजार’(देवेंद्र पुनसे), कथालेखन पुरस्कार ‘कुचंबणा’ (विशाल मोहोड), शास्त्रीय लेखन पुरस्कार ‘लीळा चरित्रातील कथनरूपे’ (डॉ. राजेंद्र रंगराव राऊत), समीक्षा लेखन पुरस्कार ‘काव्य प्रदेशातील स्त्री’ (किरण शिवहरी डोंगरदिवे), कविता लेखन पुरस्कार ‘असहमतीचे रंग’(अशोक पळवेकर), चरित्र/आत्मचरित्र लेखन पुरस्कार ‘निळाईच्या छटा’ (एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर), ललित लेखन पुरस्कार ‘गारवा आणि झळा’ (वर्षा ढोके), संत साहित्य लेखन पुरस्कार ‘पायरीचा चिरा’ (डॉ. माधवी जुमडे) या पुस्तकांसोबतच नवोदित लेखकांना देण्यात येणारे पुरस्कार यावर्षी नितीन करमरकर यांच्या ‘समर्पण’ या कथासंग्रहाला आणि मेघराज मेश्राम यांच्या ‘माणूस असण्याच्या नोंदी’ या कवितासंग्रहाला जाहीर करण्यात आला आहे.                        

राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये महेश खरात यांच्या ‘बुर्गांट (कादंबरी), पी. विठ्ठल यांच्या ‘मी सार्वकालिक सर्वत्र’ (कवितासंग्रह) आणि डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘वाचन संस्कृती, लेखन संस्कृती’ (संकीर्ण लेखन) या पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष पुरस्कारासाठी ‘गावकारागिरांचे शब्द-जीवनचित्र’(सीमा रोठे शेट्ये), बाङला मराठी शब्दकोश (संपादक : मंदिरा गांगुली, मीनल जोशी, प्रमोदिनी तापास आणि डॉ. वीणा गानू), राजन लाखे संपादित ’बकुळगंध’ आणि प्रशांत पनवेलकर यांच्या ‘नवा पेटता काकडा’ या पुस्तकांची निवड करण्यात आली आहे.

यावर्षीचा ‘युगवाणी’ उत्कृष्ट लेख पुरस्कार डॉ. नितीन रिंढे यांच्या ‘युगवाणी’तील परकाया प्रवेश या लेखासाठी जाहीर झाला असून, कथा पुरस्कार प्रणव सखदेव यांच्या ‘हंस’ या दिवाळी अंकातील ‘पतंग’ या कथेसाठी जाहीर करण्यात आला आहे तर उत्कृष्ट शाखा पुरस्कार चंद्रपूर शाखेला प्रदान करण्यात येईल. तसेच हरिकिशन अग्रवाल स्मृती वार्तांकन पुरस्कार ‘लोकमत’चे प्रवीण खापरे यांना जाहीर झाला आहे.

...............

Web Title: VISA Sangh awards announced to Sakhdev, Punse, Mohod; Agarwal Smriti Journalism Award to Praveen Khapre of Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.