शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये होणार व्हर्च्युअल क्लासरुम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 00:11 IST

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्यावतीने राज्यात ७५० व्हर्च्युअल क्लासरुम तयार करण्यात येणार आहे. यात नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या २५ शाळांची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२५ शाळांची होणार निवड : शिक्षण विभागाने पाठविली निवड केलेल्या शाळांची यादी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्यावतीने राज्यात ७५० व्हर्च्युअल क्लासरुम तयार करण्यात येणार आहे. यात नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या २५ शाळांची निवड करण्यात आली आहे. व्हर्च्युअल क्लासरुमसाठी दिलेल्या निकषानुसार जि.प.ने शाळांची यादी परिषदेकडे पाठविली आहे.राज्याच्या शिक्षण विभागाच्यावतीने समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील ठराविक शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरुमची निर्मिती केली जाणार आहे. कोणत्या शाळांमध्ये या खोल्या तयार करावयाच्या, याबाबतचा निर्णय शासनस्तरावरून केला जाणार आहे. त्याकरिता शाळांच्या निवडीसाठी शासनाने निकषही तयार केले आहेत. शासकीय शाळांमध्येच ही योजना राबविली जाणार आहे.ज्या शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरुम्स उभारायच्या आहेत, त्या उच्च प्राथमिक शाळांची संख्या शंभरपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. या शाळा व्हर्च्युअल क्लासरुम तयार करण्यासाठी स्वेच्छेने तयार झाल्या पाहिजेत. क्लासरुमसाठी शासनाकडून साहित्य पुरविण्यात येईल. त्या साहित्याच्या सुरक्षेची जबाबदारी शाळांची राहणार आहे. ज्या शाळांमध्ये विद्युत सुविधा आहेत आणि ज्यांचे मागील वर्षभराचे वीजदेयक भरले आहे अशा शाळेतच क्लासरुमच्या निमिर्तीची परवानगी दिली जाणार आहे. शिक्षण विभागाने निकषात बसणाऱ्या शाळांची निवड करून यादी परिषदेकडे पाठविली आहे.वीज देयकांचा प्रश्न सोडविण्याची गरजव्हर्च्युअल क्लासरुमसाठी आवश्यक असणारे वीजदेयकाचे आणि वीजपुरवठ्याचे निकष अनेक शाळा पूर्ण करू शकत नाहीत. अशा शाळा क्लासरुम्स उभारण्यासाठी पात्रच ठरू शकणार नसल्याचे चित्र आहे. शासनाने वीजदेयके भरण्याबाबतची सुविधा आधी उपलब्ध करून द्यावी. प्रत्येक शाळेकरिता सुरक्षारक्षक नेमून शाळा आणि तेथील सामग्रीचे संरक्षण करता येईल याची हमी द्यावी, असे झाले तरच अनेक शाळांना व्हर्च्युअल क्लासरुम उभारणे शक्य होणार आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक-शिक्षकेतर सेनेचे राज्य सरचिटणीस शरद भांडारकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाnagpurनागपूर