शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या दडीमुळे उपराजधानीत वाढतोय ‘व्हायरल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 11:41 IST

पावसाच्या उघडीपीमुळे ‘व्हायरल’ म्हणजे विषाणूजन्य तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मेयो, मेडिकलसह खासगी रुग्णालयांमध्ये या आजाराचे मोठ्या संख्येत रुग्ण उपचारासाठी येत आहेत.

ठळक मुद्देघराघरात तापाचे रुग्णखासगीसह शासकीय रुग्णालयात गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाच्या उघडीपीमुळे ‘व्हायरल’ म्हणजे विषाणूजन्य तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मेयो, मेडिकलसह खासगी रुग्णालयांमध्ये या आजाराचे मोठ्या संख्येत रुग्ण उपचारासाठी येत आहेत. विशेषत: या आजाराच्या रुग्णांत सर्वाधिक लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. व्हायरल सोबतच सर्दी, खोकला व डेंग्यू सदृश आजाराच्या रुग्णांतही वाढ झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.बदलत्या वातावरणाचा प्रभाव शरीरावर पडतो. दिवसा ऊन-पाऊस आणि सकाळ-सायंकाळी दमट वातावरणामुळे व्हायरलचा प्रकोप वाढला आहे. सोबतच सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी अशा विविध कारणांनी लोक आजारी पडत आहेत. औषधोपचारासाठी दवाखान्यात रुग्णांच्या रांगा लागत आहे. यातच डेंग्यू रुग्णांच्या संख्येतही वाढ झाल्याने लोकांत भीतीचे वातावरण आहे. मेडिकल आणि मेयो या रुग्णालयात या आजाराचे दिवसाकाठी १५-२० रुग्ण येत आहेत. पाऊस वाढल्यास यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.व्हायरलसोबतच मलेरिया, कावीळ, अतिसार व विषमज्वराचे रुग्णही दिसून येत आहेत.

श्वासांद्वारे एकाकडून दुसऱ्याकडे जंतू संक्रमिततज्ज्ञाच्या मते, ‘व्हायरल फिव्हर’ म्हणजे संक्रमित ताप. या तापाचे विषाणू घशात सुप्तावस्थेत निष्क्रिय राहतात. थंड वातावरणाशी संपर्क आल्यास किंवा थंड पाणी, आईसक्रिम, कोल्डड्रिंक प्यायल्यास विषाणू सक्रिय होतात आणि रोगप्रतिकारक शक्तीवरच हल्ला चढवितात. हा ताप एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे फैलावतो. श्वासांद्वारे एका रुग्णाकडून दुसऱ्या रुग्णाकडे जंतू संक्रमित होत असल्याने एकाच घरात व्हायरल फिव्हरचे एकपेक्षा जास्त रुग्ण दिसून येतात.

वातावरण विषाणूंसाठी पोषकसध्या शहरातील वातावरण विषाणूंसाठी पोषक आहे. विशेषत: पावसाच्या उघडीपीमुळे शरीरावर याचा प्रभाव पडतो. लहान मुलांवर याचा परिणाम लवकर दिसून येतो. यामुळे व्हायरलचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. या शिवाय पावसामुळे जागोजागी पाण्याची डबकी तयार होऊन डासांचा प्रादुर्भावही वाढल्याने मेलेरिया, डेंग्यूच्या आजारही वाढत आहे.

हॅण्ड, फूट, माऊथ डिसीजहात, पाय व तोंडात फोडं होऊन ताप असल्याचे रुग्ण अलीकडे मोठ्या संख्येत दिसून येत आहे. या फोडांकडे पाहून ‘चिकनपॉक्स’तर नाही ना, अशी शंका येते. परंतु हे ‘व्हायरल’चे एक लक्षण आहे. याला ‘हॅण्ड, फूट, माऊथ डिसिज’ म्हणूनही संबोधले जाते. अशा आजाराच्या रुग्णांनी गर्दीची ठिकाणे, शाळांमध्ये जाऊ नये. लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.-डॉ. राजेश अग्रवाल, प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्य