शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

वनविकास महामंडळाच्या जागेवर तयार होतोय ‘व्हीआयपी’ रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 12:12 IST

राष्ट्रीय मार्गाला अगदी लागून स्थानिक तास कॉलनी (भिवापूर) परिसरात वन विकास महामंडळाची प्रशस्त जागा आहे. या जागेचा वनविकास महामंडळाकडून सुयोग्य वापर होताना दिसत नाही. त्यामुळे अतिक्रमण व खासगी वापर वाढला आहे.

शरद मिरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: एरवी विकास कामे म्हटले की प्रस्ताव, मंजुरी, वर्क ऑर्डर, भूमिपूजन आलेच. यात वर्ष उलटल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होते. अशात कोणतेही सोपस्कार पार न पाडता अवघ्या १२ तासात १ कि.मी.चा रस्ता तयार झाल्यास आश्चर्यच! कुणी व्हीआयपी व्यक्ती तर येत नाही ना, असा प्रश्न उभा ठाकेल. वनविकास महामंडळाच्या जागेवर असाच एक व्हीआयपी रस्ता तयार करण्यात आला आहे.राष्ट्रीय मार्गाला अगदी लागून स्थानिक तास कॉलनी (भिवापूर) परिसरात वन विकास महामंडळाची प्रशस्त जागा आहे. या जागेचा वनविकास महामंडळाकडून सुयोग्य वापर होताना दिसत नाही. त्यामुळे अतिक्रमण व खासगी वापर वाढला आहे. कदाचित हीच संधी साधत एका व्यक्तीने वनविकास महामंडळाच्या जागेवर रस्ता तयार केला. अंदाजे १ कि.मी. अंतरापर्यंत हा रस्ता तयार करण्यात आला असून यातील अर्ध्याहून अधिक जागा वनविकास महामंडळाची तर उर्वरित जागा रेल्वे विभागाची आहे. राष्ट्रीय मार्गापासून तयार करण्यात आलेला हा रस्ता थेट एका खासगी ‘फार्महाऊस’ पर्यंत पोहचविण्यात आला आहे. रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे शासकीय कार्यालयाच्या नजरा बंद असतात. हे हेरूनच एका दिवसात हा रस्ता तयार करण्यात आला. वनविभागाच्या जागेवर रस्ता बनविण्यात आल्यामुळे अनेकांना धक्का बसला.शॉर्टकट सुविधाभिवापूर जन्मगाव असलेल्या एका वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे हे फार्महाऊस आहे. कऱ्हांडला अभयारण्याला अगदी लागून शेतजमीन असल्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात या अधिकाऱ्याने तीन वर्षापूर्वी हे फार्महाउस बांधले. मात्र आवागमनाचा रस्ता लांब पल्ल्याचा असल्यामुळे थेट राष्ट्रीय मार्गावरून फार्महाऊस गाठण्यासाठी हा शॉर्टकट ‘व्हीआयपी’ रस्ता तयार करण्यात आला. त्यासाठी चक्क वनविकास महामंडळाची जागाच कवेत घेतली.कार्यवाही सुरू आहेयासंदर्भात वनविकास महामंडळ उत्तर उमरेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर.एस. रोटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर वृत्ताला दुजोरा दिला. कार्यवाही सुरू असून मोक्कास्थळाची ऑन दि स्पॉट पाहणी करणार असल्याचे सांगितले. शिवाय याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग