शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाणीदार गावासाठी सरसावले ग्रामस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 22:32 IST

नरखेड तालुक्यातील ६६ गावांत पाणी फाऊंडेशनच्या ‘वॉटर कप’ स्पर्धेचे वारे जोरदार वाहू लागले आहे. गत आठवडाभरापूर्वी पाणीदार गाव करण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली. त्याअंतर्गत अख्खेच्या अख्खे गाव जोमाने कामाला लागले आहे. खैरगावही त्यात मागे नाही. या गावात वयोवृद्धांपासून तर बालकांपर्यंत जमेल ते काम करण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यामुळेच गाव पाणीदार होण्याचे शुभसंकेत मिळत आहे. या उपक्रमासाठी ग्रामस्थांनी आपापल्या परीने निधीही उभारला. त्यात तेथील शाळेचाही मोठा हातभार लागला, हे विशेष!

ठळक मुद्देसामूहिक श्रमदान अन् आर्थिक हातभारखैरगावमध्ये वयोवृद्धांपासून बच्चेकंपनीही उतरली मैदानात

गणेश खवसे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नरखेड तालुक्यातील ६६ गावांत पाणी फाऊंडेशनच्या ‘वॉटर कप’ स्पर्धेचे वारे जोरदार वाहू लागले आहे. गत आठवडाभरापूर्वी पाणीदार गाव करण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली. त्याअंतर्गत अख्खेच्या अख्खे गाव जोमाने कामाला लागले आहे. खैरगावही त्यात मागे नाही. या गावात वयोवृद्धांपासून तर बालकांपर्यंत जमेल ते काम करण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यामुळेच गाव पाणीदार होण्याचे शुभसंकेत मिळत आहे. या उपक्रमासाठी ग्रामस्थांनी आपापल्या परीने निधीही उभारला. त्यात तेथील शाळेचाही मोठा हातभार लागला, हे विशेष!अभिनेता आमिर खानच्या ‘पाणी फाऊंडेशन’तर्फे ‘ड्राय झोन’ गावात ‘वॉटर कप’ स्पर्धा घेण्यात येत आहे. याअंतर्गत गावाची तहान गावातच भागली जावी, यावरच भर देण्यात येत आहे. त्यामुळे तहानलेल्या गावात पानवठे - बंधारे, बांध तयार करणे, पाण्याचे स्रोत शोधून त्या पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि विशेष म्हणजे ही सर्व कामे लोकसहभागातून करणे हा प्रमुख उद्देश या ‘वॉटर कप’चा आहे.नरखेड तालुक्यातील तब्ब्ल ६६ गावे या स्पर्धेत समाविष्ट करण्यात आली आहे. संबंधित गावात जोरदार तयारी करण्यात येत आहे. गावातील प्रत्येक नागरिक आपापल्या परीने जे काम करता येईल, त्यासाठी स्वत:हून पुढे येत आहे. एवढेच काय तर त्यात वयोवृद्ध आणि बच्चेकंपनीही मागे नाही. अख्खे गाव सामूहिक श्रमदान करून बांध-बंधारे बांधण्याच्या कामात व्यस्त आहे. याच तालुक्यातील खैरगावात अशाप्रकारचे चित्र असून ग्रामस्थांनी दाखविलेल्या एकजुटतेबद्दत स्तुतिसुमने उधळली जात आहे.सामूहिक श्रमदानासोबतच खैरगाव येथील कामासाठी लागणारा पैसा उभारण्यासाठीही ग्रामस्थांनीच पुढाकार घेतला. त्यातून पै-पै करून बऱ्यापैकी निधी जमा झाला. त्यात जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पंकज देवते, प्रकाश गणोरकर, भूषण बेलसरे, सुधाकर काळे, कृष्णाराव खरळकर, गणेश चौधरी, विलास कोरडे, अजय बारमासे, चेतन खुरळकर, रामराव बेलसरे, रवींद्र सोरते, किसना सावरकर, किशोर अलोने, दिलीप अकर्ते यांच्यासह इतर ग्रामस्थांचा आर्थिक हातभार लागला.पुरस्कारापेक्षा गावात पाणी महत्त्वाचे!‘वॉटर कप’ स्पर्धेअंतर्गत नरखेड तालुक्यातील गावा-गावांत जणू चढाओढच सुरू झाल्याचे चित्र नजरेस पडते. या उपक्रमात पहिल्या दिवशी उमठा येथे तब्बल ८० दगडी बांध ग्रामस्थांनी सामूहिक श्रमदानातून तयार करण्याचा पराक्रम केला. इतर गावातही कमी-अधिक प्रमाणात ग्रामस्थांचे अशाप्रकारचे प्रयत्न सुरू आहे. गावा-गावांत अशाप्रकारे ही स्पर्धा सुरू झालेली असली तरी, गावाला पुरस्कार मिळाला नाही तरी गावाची तहान गावातच भागणार ही बाब महत्त्वाची असल्याची प्रतिक्रिया आता ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर