शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

विमा योजनेसाठी गाव हा घटक असावा : शेतकरी प्रतिनिधींच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 22:48 IST

शेतकऱ्यांना खरच पीक विम्याचा लाभ द्यायचा असेल तर या योजनेंतर्गत गाव हा घटक गृहीत धरण्यात यावा, विमा कंपन्यांची कार्यालये गावपातळीवर उघडण्यात यावीत, अशी विनंतीपर सूचना शेतकऱ्यांच्या बहुतांश प्रतिनिधी व खासदारांनी संसदीय कृषी समितीसमोर केली.

ठळक मुद्देसंसदीय कृषी समितीच्या बैठकीत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विमा योजनेमध्ये शेतकरी पैसे भरतात. परंतु त्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना वेळेवर मदत मिळत नाही. तसेच नुकसानीच्या नियमामुळे सुद्धा अनेक शेतकरी वंचित राहतात. शेतकऱ्यांना खरच पीक विम्याचा लाभ द्यायचा असेल तर या योजनेंतर्गत गाव हा घटक गृहीत धरण्यात यावा, विमा कंपन्यांची कार्यालये गावपातळीवर उघडण्यात यावीत, अशी विनंतीपर सूचना शेतकऱ्यांच्या बहुतांश प्रतिनिधी व खासदारांनी संसदीय कृषी समितीसमोर केली.पंतप्रधान विमा योजनेवर चर्चा करण्यासाठी संसदेची कृषी विषयक स्थायी समिती आजपासून दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर आली आहे. खा. पर्वतगौडा गड्डीगौडा हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीमध्ये एकूण ३५ खासदारांचा समावेश आहे. आज या समितीची बैठक वर्धा रोडवरील हॉटेल रेडीसन ब्ल्यूमध्ये झाली. बैठकीत ११ सदस्य उपस्थित होते. यात खा. नवनीत राणा यांचा समावेश होता. यासोबतच शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनाही आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील, ज्येष्ठ नेते विजय जावंधिया, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी आदी उपस्थित होते.या बैठकीत पंतप्रधान विमा योजनेच्या नवीन प्रारुपावर चर्चा झाली. यावेळी अनेक सदस्यांनी विमा योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी काय-काय अडचणी आहेत त्या मांडल्या. परंतु सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेतकरी विमा भरतात, परंतु याचा त्यांना लाभ होताना दिसून येत नाही. उलट विमा कंपन्याच नफा कमवित असल्याचे चित्र आहे. तेव्हा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ होईल, यासाठी गाव किंवा ग्रामपंचायत हा घटक धरण्यात यावा, अशी मागणी लावून धरली. समितीने सर्वांचे म्हणणे गांभीर्याने ऐेकून घेतले. समिती उद्या शुक्रवारी कृषी संशोधन परिषद, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, मृदु संधारण केंद्र, लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र यांना भेट देऊन पाहणी करणार आहे.विम्याची संपूर्ण जबाबदारी सरकारने घ्यावीविमा योजना चांगली आहे. परंतु अंमलबजावणी होत नाही. तीच मुख्य अडचण आहे. घटनेनुसार शेती हा राज्याचा विषय असला तरी शेतीसंदर्भातील सर्व काही विषय हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे केंद्र आपली जबबदारी टाळू शकत नाही. विम्याची जबाबदारी ही १०० टक्के सरकारने घ्यावी. ५० टक्के केंद्र व ५० टक्के राज्य सरकारने भरावे. तसेच गाव किंवा ग्रामपंचायत हा घटक असावा,अशी सूचना आपण केली आहे.विजय जावंधिया, ज्येष्ठ नेते, शेतकरी संघटनाविमा कंपनीचे कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात असावेविमा कंपन्या हा दररोज २१.९ कोटी रुपये नफा कमावतात. परंतु शेतकºयांना पीक विम्याचा लाभ हवा तसा मिळत नाही. यात अनेक अडचणी आहेत. सर्वात महत्त्वाचे तर नुकसान झले तर कुणाला भेटावे ही अडचण असते. गावपातळीवर विमा कंपनीचे कार्यालयच नाही. तेव्हा गावपातळीवर कार्यालयाची सुविधा उपलब्ध करावी, अशी सूचना आपण केली.नवनीत राणा,खासदार , समिती सदस्यपंचतारांकित हॉटेलमध्ये बैठकीवरून नाराजीशेतकऱ्यांशी संबंधित संसदीय समितीची बैठक पंचतरांकित हॉटेलमध्ये ठेवण्यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. नागपुरात रविभवन, वनामतीसारख्या अनेक शासकीय जागा असताना पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक का, असा प्रश्नही विचारला जात आहे. काही सदस्यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली. सोबतच बैठक कुठेही झाली तरी शेतकऱ्यांसाठी काहीतरी ठोस निर्णय व्हावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली.विम्याची संपूर्ण जबाबदारी सरकारने घ्यावीविमा योजना चांगली आहे. परंतु अंमलबजावणी होत नाही. तीच मुख्य अडचण आहे. घटनेनुसार शेती हा राज्याचा विषय असला तरी शेतीसंदर्भातील सर्व काही विषय हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे केंद्र आपली जबबदारी टाळू शकत नाही. विम्याची जबाबदारी ही १०० टक्के सरकारने घ्यावी. ५० टक्के केंद्र व ५० टक्के राज्य सरकारने भरावे. तसेच गाव किंवा ग्रामपंचायत हा घटक असावा,अशी सूचना आपण केली आहे.विजय जावंधियाज्येष्ठ नेते, शेतकरी संघटना

 

टॅग्स :Farmerशेतकरी