शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
5
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
6
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
7
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
8
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
9
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
10
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
11
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
12
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
13
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
14
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
15
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
16
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
18
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
19
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

‘विक्रम प्रतिसाद दे, सिग्नल तोडलास तरी आम्ही चालान फाडणार नाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 16:11 IST

नागपूर शहर पोलिसातील एका अधिकाऱ्याने चक्क आपल्याच खात्याच्या अधिकृत ट्विटरवरून ट्विट केले, 'प्रिय विक्रम, कृपया प्रतिसाद दे. तू सिग्नल तोडलास तरी आम्ही चालान फाडणार नाही.'

ठळक मुद्देविक्रमच्या संपर्काची हळहळ नागपूर पोलिसांकडून सोशल मीडियावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इस्त्रोने चंद्रावर पाठविलेले यान अगदी शेवटच्या क्षणी संपर्क क्षेत्राबाहेर गेले. काही वेळातच यान चंद्रावर उतरणार असतानाच तिकडून सिग्नल मिळणे बंद झाले. अवघा देशच चिंतातूर झाला. अशावेळी लोकांची चिंता वाहणारे पोलीस खाते कसे बरे शांत राहणार! नागपूर शहर पोलिसातील एका अधिकाऱ्याने चक्क आपल्याच खात्याच्या अधिकृत ट्विटरवरून ट्विट केले, 'प्रिय विक्रम, कृपया प्रतिसाद दे. तू सिग्नल तोडलास तरी आम्ही चालान फाडणार नाही.' 

नागपूर शहर पोलिसांच्या अधिकृत ट्विटरवरून ट्विट झालेला हा संदेश वाईट नसला तरी काही क्षणात देशभर पसरलेल्या या संदेशामुळे बरीच खळबळ मात्र उडालीयं. वाहतुकीचे नियम मोडल्यावर केल्या जाणाऱ्या दंडाच्या आकारणीमध्ये सरकारने याच आठवड्यात बरीच वाढ केली आहे. त्यावर समाजमाध्यमांपासून तर सर्वसामान्य जनतेमध्ये बराच गदारोळ उडालेला आहे. त्यावर बऱ्याच उलटसुलट प्रतिक्रियाही उमटत आहेत. देशभर या चर्चा सुरू असतानाच इस्रोच्या चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरचा संपर्क अकस्मातपणे चंद्रापासून अवघ्या २.१ किलोमीटरवर असताना तुटला. शास्त्रज्ञांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही अंतराळातून सिग्नल मिळत नव्हता. त्यामुळे संपूर्ण देशच चिंतातूर झाला होता. अशातच सिग्नल मिळाल्याचे वृत्त आले आणि आशेचा सूर गवसला. नेमक्या या गंभीर वातावरणातही आपली विनोदबुद्धी शाबूत ठेऊन नागपूर पोलीस विभागातील एका अधिकाऱ्याने वरील ट्विट इंग्रजीतून केले. सोमवारी दुपारी १.१५ वाजता झालेले हे ट्विट काही क्षणातच सर्वदूर पोहचले. हे ट्विट वाचल्यावर अनेकांनी पोलिसांच्या कल्पकतेचे कौतुक केलेच, मात्र दुसरीकडे त्यावर उलटसुलट प्रतिक्रियाही उमटायला लागल्या आहेत.पोलीस आणि पोलीस खाते सदैव तणावामध्ये असते. या तणावातही विनोदबुद्धी वापरून स्वत:सह सहकाऱ्यांना आणि इतरांनाही खळखळून हसायला लावणारे अधिकारी-कर्मचारी असतातच. मोटार वाहन कायद्याच्या तरतुदीतील वाढलेल्या दंडाच्या पार्श्वभूमीवर विक्रमच्या सिग्नलचा संबंध जोडल्याने पोलिसांचे हे ट्विट अधिक चर्चेचे आणि हास्य फुलविणारे ठरले आहे.युजर्सकडून या ट्विटवर बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत. १३३ कोटी भारतीयांच्या आशा विक्रमकडून असल्याने पोलिसांच्या या ट्विटचे कौतुकही अनेकांनी केले आहे. तर दुसरीकडे मात्र, ‘काहीही. एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याने देखील त्याच्या स्वत:च्या खात्यातून असे केले तर ठीक आहे. पण एखाद्या विभागाचे अधिकृत खाते वापरून असे वाक्य लिहिणे चांगले नाही,’ अशी प्रतिक्रियाही उमटत आहे. ‘ग्रेट सेन्स ऑफ ह्यूमर’ अशा शब्दातही पोलिसांचे कौतुक होत आहे, तर दुसरीकडे पोलिसांच्या कायदारक्षणावरही चर्चा सुरू झाल्या आहेत.एकंदर काहीही का असेना, पण या ट्विटच्या निमित्ताने नागपूरच्या पोलिसांनी देशभर धमाल उडवून दिलीयं, हे मात्र नक्कीच!युजर्सकडून या ट्विटवर बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत. १३३ कोटी भारतीयांच्या आशा विक्रमकडून असल्याने पोलिसांच्या या ट्विटचे कौतुकही अनेकांनी केले आहे. तर दुसरीकडे मात्र, ‘काहीही. एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याने देखील त्याच्या स्वत:च्या खात्यातून असे केले तर ठीक आहे. पण एखाद्या विभागाचे अधिकृत खाते वापरून असे वाक्य लिहिणे चांगले नाही,’ अशी प्रतिक्रियाही उमटत आहे. ‘ग्रेट सेन्स ऑफ ह्यूमर’ अशा शब्दातही पोलिसांचे कौतुक होत आहे, तर दुसरीकडे पोलिसांच्या कायदारक्षणावरही चर्चा सुरू झाल्या आहेत.एकंदर काहीही का असेना, पण या ट्विटच्या निमित्ताने नागपूरच्या पोलिसांनी देशभर धमाल उडवून दिलीयं, हे मात्र नक्कीच!

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2Nagpur Policeनागपूर पोलीस