शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

अमेरिकेच्या प्रतिष्ठित हम्फ्रे फेलोशिप प्रोग्रामसाठी विजयलक्ष्मी बिदरी यांची निवड

By shrimant mane | Updated: September 17, 2024 22:35 IST

या फेलोशिपसाठी भारतातून त्या एकमेव अधिकारी आहेत.

नागपूर: अमेरिका येथील जॉन एफ. कॅनडी स्कुलतर्फे आयोजित केलेल्या डिस्टिंग्विश्ड हम्फ्रे फेलोशिप प्रोग्राम ‘लिडरशिप फॉर 21- सेंचुरी’ या कार्यक्रमासाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची निवड झाली आहे. या फेलोशिपसाठी भारतातून त्या एकमेव अधिकारी आहेत.

वॉशिंग्टन, डी.सी.येथे सरकारमधील किंवा सरकारबाहेरील वरिष्ठ व्यावसायिकांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या तीन आठवड्यांचा फेलोशिप प्रोग्राममध्ये, गंभीर समस्या असलेल्या क्षेत्रांमध्ये धोरण-स्तरीय जबाबदाऱ्या, नेतृत्व विकास सुलभ करणे, योग्य धोरणे आणि कार्यक्रम विकसित करण्याची क्षमता मजबूत करणे आणि इतर प्रमुख मुद्द्यांवर बहुपक्षीय सहयोग आणि सहकार्यास प्रोत्साहन देणे हा या फेलोशिपचा मुख्य  उद्देश आहे. दिनांक 18  सप्टेंबर पासून श्रीमती बिदरी या जॉन एफ. कॅनडी स्कूल येथे आयोजित लिडरशिप प्रोग्रामसाठी उपस्थित राहणार आहेत.

या फेलोशिपसाठी जगातील 12 देशांतील प्रतिष्ठित 12 व्यक्तींची निवड झाली असून यामध्ये भारतातून श्रीमती बिदरी यांचा समावेश आहे.  या नामांकनासाठी युनायटेड स्टेट्स-इंडिया एज्युकेशनल फाऊंडेशन (USIEF), नवी दिल्लीच्या  फुलब्राइट आयोगाकडून त्यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

हार्वर्ड यूनिवर्सिटीच्या जॉन एफ. कॅनडी स्कूल ऑफ गवर्नमेंट येथे, २१ व्या शतकासाठी नेतृत्व: अराजकता, संघर्ष आणि धैर्य या विषयावर कार्यकारी-स्तरीय सेमिनारमध्ये नामाकंन असलेल्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. या फेलोशिप अंतर्गत जागतिक स्तरावरील प्रमुख वक्ते व  निवड झालेले सहभागी यांच्यामध्ये संवादात्मक चर्चांमध्ये केस स्टडीजसह नेतृत्वाभोवती निर्माण होणाऱ्या प्रमुख समस्या आणि आव्हानांवर चर्चा व उपाययोजंनावर परस्पर चर्चा  होणार आहे. यामध्ये नेतृत्वांशी संबंधित धोरणे, नेतृत्व करण्याच्या नवीन पद्धतींचा परिचय तसेच नेतृत्व व अधिकारी यांच्यामधील संबंध कसे असावे  त्यावरील प्रभाव आणि वैयक्तिक आणि संस्थात्मक गतिशीलतेमधील बदल व्यवस्थापन या ठळक मुद्द्यांचा समावेश आहे.

डॉ.विपीन इटनकर यांचेकडे अतिरिक्त कार्यभार

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अमेरिकेतील फेलोशिपच्या कार्यकाळात विभागीय आयुक्त या पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचेकडे देण्यात आला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर