लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ(जेएनयू)मधील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ नागपुरातील प्राध्यापक आणि झोपडपट्टी फुटबॉलचे प्रवर्तक प्रा. विजय बारसे यांनी मौनव्रत धारण केले आहे. बुधवारी संविधान चौकात त्यांनी आपल्या आंदोलनाची सुरुवात केली असून, ते तीन दिवस मौन राहतील.मौनव्रत धारण केलेल्या प्रा. बारसे यांच्यावतीने माजी नगरसेवक तनवीर अहमद यांनी सांगितले की, दिल्ली येथील जेएनयूवरील विद्यार्थ्यांवर जो अमानुष हल्ला झाला तो अतिशय संतापजनक आहे. हा हल्ला सरकार प्रायोजित हल्ला आहे. ज्यांनी हल्ला केला त्यांनी या हल्ल्याची कबुली दिली. त्यांच्यावर गुन्हे दाखल न करता जे पीडित आहेत, त्यांच्याविरुद्धच गुन्हे दाखल केले जात आहेत. सरकार लोकांची दिशाभूल करीत आहे. आरोपींची नावे उघड झाली तर सरकारचे पितळ उघडे पडेल. केंद्रातील सरकार असंवेदनशील असून, या सरकारची आत्मा जागी व्हावी, पीडितांना न्याय मिळावा, यासाठी हे मौनव्रत आंदोलन आहे.
जेएनयूवरील हल्ल्याच्या निषेधार्थ विजय बारसे यांचे मौनव्रत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 00:49 IST
दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ(जेएनयू)मधील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ नागपुरातील प्राध्यापक आणि झोपडपट्टी फुटबॉलचे प्रवर्तक प्रा. विजय बारसे यांनी मौनव्रत धारण केले आहे.
जेएनयूवरील हल्ल्याच्या निषेधार्थ विजय बारसे यांचे मौनव्रत
ठळक मुद्देसरकारच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप : केंद्रातील सरकार असंवेदनशील