शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
3
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
4
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
5
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
6
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
7
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
8
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
9
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
10
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
11
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
12
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
13
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
14
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

पोलिसांना धारेवर धरणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 11:22 PM

Woman holding police Video viral कारवाईसाठी सरसावलेल्या वाहतूक पोलिसांना दमदाटी करत एका महिलेने चांगलाच गोंधळ घातला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे शहरात काही काळ चांगलीच खळबळ उडाली होती.

ठळक मुद्देशहरात खळबळ उलट-सुलट चर्चेला उधाण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कारवाईसाठी सरसावलेल्या वाहतूक पोलिसांना दमदाटी करत एका महिलेने चांगलाच गोंधळ घातला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे शहरात काही काळ चांगलीच खळबळ उडाली होती.

घटना गुरुवारी दुपारी शहीद चौक इतवारीत घडली. डबल सीट दुचाकीवर येताना पाहून शहीद चौकात वाहतूक पोलिसांनी एका महिलेला थांबण्यासाठी हात दाखवला. मात्र पोलिसांना न जुमानता ती सुसाट वेगाने पुढे निघून गेली. संशय आल्यामुळे पोलिसांनी तिचा पाठलाग केला त्यामुळे ती घाबरली आणि बाजूच्या गल्लीत दुचाकी घसरून पडली. दरम्यान, पोलीस तेथे पोहोचले त्यांनी तिला पळून जाण्याचे कारण विचारले तिने पोलिसांना उत्तर देण्याऐवजी त्यांना चांगलेच फैलावर घेतले. माझ्याकडे मास्क आहे, हेल्मेट आणि परवानाही आहे. त्यामुळे तुम्ही मला थांबवलेच कसे, अशी विचारणा करून महिलेने वाहतूक शाखेच्या पोलिसांना धारेवर धरले. ती मोठमोठ्याने ओरडू लागली. दरम्यान, पोलिसांनी तहसील ठाण्यात माहिती देऊन मदत मागवली. मोठ्या प्रमाणात पोलीस आल्यामुळे बिथरलेल्या महिलेने बाजूच्या खड्डेकडे धाव घेतली. एका पोलिसांनी तिला कसेबसे तेथून दुचाकी जवळ आणले. त्यामुळे नंतर तिने दुचाकीचे डिक्की खोलून त्यातून बाटली काढली आणि पेट्रोल अंगावर घेऊन आत्महत्या करतो, असे मनात गोंधळ घातला. तिच्या या पवित्र्यामुळे पोलीस हादरले. काही पोलीस आणि गर्दी करणाऱ्या नागरिकांनीही तिला समजावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, महिला पोलिसांनी त्या त्या महिलेला आणि तिच्या मुलीला ताब्यात घेऊन तहसील ठाण्यात नेले. येथे ठाणेदार जयेश भांडारकर यांनी तिची आणि वाहतूक पोलिसांची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर प्रकरण अदखलपात्र (एनसी)करीत तिला समज देऊन घरी पाठविण्यात आले. दरम्यान, या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे काही वेळ शहरात चांगलीच खळबळ उडाली होती.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसWomenमहिला