शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: ...जेव्हा नागपूरात माथेफिरू चाकू घेऊन पर्यटकांच्या मागे पळतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 18:00 IST

अनेकांची नुसतीच पळापळ, व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ

नागपूर : अंबाझरी तलावाच्या काठावर पावसात चिंब होण्याची हौस भागवून घेणा-या शेकडो जणांची एका सशस्त्र दारूड्याने सोमवारी सायंकाळी घाबरगुंडी उडवली. शस्त्र घेऊन तो मागे धावत असल्याने तरुण, तरुणी, महिला, पुरूष अशा सर्वांनीच आरडाओरड करत जीव मुठीत घेऊन पळ काढला. बराच वेळेनंतर हिम्मत दाखवत एकाने त्याच्या हातचे शस्त्र हिसकावले. त्यानंतर पुढे आलेल्या काहींनी त्याला चोप दिला.

गेल्या तीन दिवसांपासून नागपुरात पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी, नाले तुडूंब भरले आहे. अंबाझरी तलावही ओव्हर फ्लो झाला आहे. अंबाझरी ओव्हर फ्लो झाला की तेथे काठावर शेकडो जण गर्दी करतात. तरुणाईची संख्या त्यात मोठी असली तरी अनेक जण पत्नी आणि मुलांसह तेथे पोहचून चिंब होण्याचा आनंद घेतात. सोमवारी दिवसभर अंबाझरीच्या काठावर अशीच गर्दी होती. तरुण तरुणी पाण्यात भिजत गंमत जंमत करीत असतानाच अचानक एक दारूडा हातात भला मोठा सत्तूर (कोयता) आणि दुस-या हातात लोखंडी साखळी घेऊन तेथे पोहचला. त्याने गर्दीकडे धाव घेताच अनेकांची घाबरगुंडी उडाली. तरुणी आणि महिलाच नव्हे तर तरुण आणि पुरुष मंडळीही त्या दारुड्याच्या धाकाने जीव वाचविण्यासाठी पळू लागले.

दोन-तीनशे जणांची गर्दी असताना एका दारुड्याला पकडण्याती हिम्मत दोन तीन तरुण दाखवत नव्हते. त्यामुळे निर्ढावलेला दारूडा महिला-मुलींमागे आरडाओरड करीत शस्त्र घेऊन धावत होता. काही वेळेनंतर त्याने पाण्यात असलेला भला मोठा दगड उचलला. बराच वेळेपासून त्याचा हा गोंधळ सुरू होता. शेवटी एका व्यक्तीने हिम्मत करून त्याच्यावर धाव घेतली. त्याचे शस्त्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. केवळ त्याला थापड मारण्याचा धाक दाखवला अन् आतापर्यंत अनेकांना घाबरवून सोडणारा हा दारूडा घाबरला. त्याने आपले शस्त्र टाकले. नंतर त्याच्यावर अनेकांनी धाव घेतली आणि काहींनी त्याला चोप दिला.

पोलिसांची धावपळ, आरोपीला अटक विशेष म्हणजे, पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने शहरात मोठ्या संख्येत जागोजागी पोलीस दिसतात. ज्यावेळी दारूड्याचा हा हैदोस सुरू होता. त्यावेळी काहींनी मोबाईलवर त्याचा व्हिडीओ बनविला. मात्र, कोणत्याही सजग नागरिकाने १०० नंबरवर किंवा अंबाझरी ठाण्यात फोन करून पोलिसांना कळविण्याची तसदी घेतली नाही. मंगळवारी सकाळी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली. अंबाझरीचे ठाणेदार भीमराव खंदाळे यांनी लगेच मंगळवारी अंबाझरी तलावावर पोलिसांचा बंदोबस्त लावला. व्हिडीओच्या मदतीने त्या दारूड्याची माहिती पोलिसांनी काढली. त्याचे नाव विकास मारके असून,  मंगळवारी दुपारी १.३० च्या सुमारास पोलीस त्याच्या घरी पोहचण्यापूर्वीच तो पळून गेला. त्याचे वर्तन मनोरुग्णासारखे असल्याची माहिती आजुबाजुच्यांनी पोलिसांना दिली.