शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 22:45 IST

मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी घेतला शोध

नागपूर : चार लाखांच्या उधारीच्या वादातून चार आरोपींनी एका वाहन विक्रेत्याचे भर दिवसा अपहरण केले. आरोपींनी एका दुकानात विक्रेत्याला नेत तेथे बेदम मारहाण केली व तो व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड केला. मोबाईल लोकेशनच्या आधारे काही तासांतच पोलिसांनी आरोपींचा शोध घेत अपहृत व्यक्तीची सुटका केली. कळमना पोलीस ठाण्याच्या पथकाने वेळेत पावले उचलल्याने अपहृत व्यक्तीचा जीव वाचला.शाहीद अली अमजद अली (३१, ओमसाईनगर, कळमना) असे अपहृत व्यक्तीचे नाव आहे. त्याचा वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. शाहीदने आरोपी अफजल अहमद जावेद इकबाल (२९, अन्सारनगर, मोमीनपुरा) व सय्यद अतिफ जोहर सय्यद नजीम जोहर (३२, हफीज बेकरीजवळ, मोमीनपुरा) यांच्याकडून चार लाख उधार घेतले होते. त्या पैशांवरून त्यांचा शाहीदसोबत वाद सुरू होता. गुरुवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास आरोपींनी शाहीदला बेलेनगर येथील मामाच्या दुकानातून दुचाकीवर बसवून शांतीनगर पुलाकडे नेले. पैशांबाबत बोलायचे आहे असे त्यांनी कारण सांगितले होते. आरोपींच्या मनात काळेबेरे आहे याची शंका शाहीदला आली.रस्त्यात कामरान नकीब अशपाक अहमद (२९, मोमीनपुरा) हा दिसला. शाहीदने त्याला मदतीसाठी हाक मारली. मात्र तो आरोपींसोबतच होता. तिघांनीही मिळून शाहीदला बेदम मारहाण केली. त्यानंतर ते त्याला सय्यदच्यादुल्हन नावाच्या कपड्यांच्या दुकानात घेऊन गेले. तेथे कोंंडून त्याला परत मारहाण करण्यात आली. तेथे जमाल अहमद जावेद इकबाल (२६, अन्सार नगर, मोमीनपुरा) या आरोपीने शाहीदच्या मारहाणीचा व्हिडीओ तयार केला व तो स्नॅपचॅटवर अपलोड केला. दरम्यान शाहीद यांनी ११२ वर फोन करून पोलिसांना हा प्रकार कळविला.कळमना पोलीस ठाण्याच्या पथकाने शाहीदच्या मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून लोकेशनचा शोध घेतला व सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शाहीदची सुटका केली. कळमना पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून दोन दुचाकी, चार मोबाईल, बेसबॉल स्टीक जप्त केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे, शशिकांत मुसळे, ज्ञानेश्वर मोरे, विलास गमे, विशाल भैसारे, वसीम देसाई, ललित शेंडे, अविनाश चौहान, अजय गटलेवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर