शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पतीला पाठविलेल्या व्हिडीओ क्लीपिंगने नववधूच्या वैवाहिक आयुष्यात कालविले विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:58 IST

पतीच्या मोबाईलवर आलेल्या अश्लील क्लिपिंगने आठवडाभरातच नववधूच्या वैवाहिक आयुष्यात विष कालविले आहे. नंदनवन पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना समोर आली आहे. पोलिसांनी बाबुळखेडा येथील रहिवासी आरोपी अक्षय अरूण शेंडे याच्याविरोधात विनयभंग आणि आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देनागपुरातील नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पतीच्या मोबाईलवर आलेल्या अश्लील क्लिपिंगने आठवडाभरातच नववधूच्या वैवाहिक आयुष्यात विष कालविले आहे. नंदनवन पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना समोर आली आहे. पोलिसांनी बाबुळखेडा येथील रहिवासी आरोपी अक्षय अरूण शेंडे याच्याविरोधात विनयभंग आणि आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार २३ वर्षीय युवतीचे २ जून रोजी लग्न झाले होते. तरुणीच्या वडिलांचा मृत्यू झाला असून कुटुंबात मोठी बहीण व भाऊ आहे. आरोपी अक्षय हा तरुणीच्या वस्तीमधीलच राहणारा असल्याने त्याच्या परिचयाची असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी दुपारी अक्षयने तरुणीच्या पतीच्या मोबाईलवर तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ क्लीपिंग पाठविले. ही क्लीप पाहताच पतीला धक्का बसला. त्याने पत्नीची विचारपूस केल्यानंतर क्लीप बघून तिलाही धक्का बसला. अधिक चौकशी केली असता आरोपी अक्षयद्वारे हे कृत्य केल्याचे उघड झाले. तरुणीने नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी विनयभंग तसेच आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र या घटनेमुळे तरुणीच्या वैवाहिक आयुष्यात वादळ निर्माण झाले असून तिच्याप्रति पतीचे वागणेही बदलले आहे. त्याने तरुणीला सोबत ठेवण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे अक्षयच्या कृत्याने तरुणीच्या कुटुंबामध्ये रोष वाढला आहे. पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग