शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

प्रेयसीला मारहाण करून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 12:03 IST

Nagpur News अल्पवयीन प्रेयसी दुसऱ्याशी कनेक्ट झाल्याच्या संशयावरून तिचे अपहरण करून तिला प्रियकराने धावत्या दुचाकीवर मारहाण केली. त्याचा व्हिडिओ बनवून तो इन्स्टाग्रामवर अपलोड केला.

ठळक मुद्देअपहरण अन् बलात्कारआरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अल्पवयीन प्रेयसी दुसऱ्याशी कनेक्ट झाल्याच्या संशयावरून तिचे अपहरण करून तिला प्रियकराने धावत्या दुचाकीवर मारहाण केली. त्याचा व्हिडिओ बनवून तो इन्स्टाग्रामवर अपलोड केला. हा संतापजनक प्रकार उघड होताच दोन भामट्यांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या बांधल्या. समीर खान सलीम खान (वय १९, रा. बंगाली पंजा, पाचपावली) आणि मोहम्मद शाकिन मोहम्मद सिद्दिकी (वय २५, रा यशोदानगर) अशी त्यांची नावे आहेत.

आरोपी स्वतःला टिक टॉक स्टार म्हणवून घेत चमकोगिरी करत फिरतात. आरोपी समीरचे एका १७ वर्षीय मुलीसोबत २ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी एका बर्थ डे पार्टीत ती दुसऱ्या एका युवकासोबत सलगी करताना दिसल्यामुळे समीर अस्वस्थ झाला. त्याने तिला धारेवर धरणे सुरू केले. त्यामुळे ती समीरला टाळू लागली. यातून आपली प्रेयसी दुसऱ्यासोबत कनेक्ट झाल्याचा त्याला संशय आला. तिला धडा शिकवण्यासाठी त्याने तिच्या अपहरणाचा कट रचला. १८ जूनला त्याने तिला कमाल चौकात भेटायला बोलावले. यावेळी समीर सोबत त्याचा साथीदार शाकिन होता. या दोघांनी जबरदस्तीने तिला दुचाकीवर बसवले. तिला मारहाण करत वीटभट्टी चौकात नेले. हे करतानाच धावत्या दुचाकीवरील मारहाणीचा व्हिडिओही आरोपींनी बनविला. तो इन्स्टाग्रामवर अपलोड केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुलीच्या मित्रांनी तो पोलीस अधिकाऱ्यांना पाठविला. त्यावरून पोलिसांनी व्हिडिओ बनविणार्‍या आणि अपलोड करणाऱ्या आरोपी समीर आणि शाकीनचा शोध घेतला आणि त्यांना शनिवारी अटक केली.

फेसबुकवरची ओळख भोवली

मुलीने पोलिसांकडे या घटनेची माहिती देताना आरोपी समीरसोबत दोन वर्षांपूर्वी फेसबुकवरून ओळख झाल्याचे आणि त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण झाल्याचे सांगितले.

 

लैंगिक छळही केला

आरोपीने लैंगिक छळ करून अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप मुलीने तक्रारीत केला. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

---

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी