शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाचा प्रस्ताव बासनात गुंडाळला, विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार यांचा आरोप

By मंगेश व्यवहारे | Updated: December 20, 2023 19:37 IST

याच कारणावरून विरोधकांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभात्याग करीत आंदोलन केले.

नागपूर :  विधानसभेत विदर्भाच्या चर्चेचा प्रस्ताव असताना सत्ताधाऱ्यांनी या प्रस्तावावर चर्चा न करता तो बासनात गुंडाळून विदर्भाची घोर निराशा केली असा सनसनाटी आरोप, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. 

याच कारणावरून विरोधकांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभात्याग करीत आंदोलन केले. वर्षा गायकवाड यांनी विदर्भाच्या प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी केली मात्र त्यांना गप्प बसवून कामकाज रेटण्यात आले. सत्ताधाऱ्यांनी विदर्भाच्या सर्व मुद्यांवर २९३ अन्वये चर्चेसाठी मांडला होता. परंतू मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तो टाळून अंतिम आठवडा प्रस्ताव चर्चेला घेतला. सत्ताधाऱ्यांचा हा डाव विरोधकांची मुस्कटदाबी करणारा आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. कारण सत्ताधाऱ्यांना लवकरात लवकर कामकाज आणि अधिवेशन गुंडाळून नवी दिल्लीचे विमान गाठायचे होते. संयुक्त महाराष्ट्राचा करारात विदर्भात अधिवेशन अधिवेशन घेऊन विदर्भातील मुद्यांवर चर्चा होणे अपेक्षित होते. सत्ताधारी स्वतःच प्रस्वाव मांडतात आणि ऑर्डर ही विधानसभा चालविण्याची पद्धत नव्हे.

ऑफ डे मध्ये प्रस्ताव असतानाही तो सभागृहात चर्चेला घेतला जात नाही. हा प्रकार निंदनिय असून, ही  विधानसभा चालविण्याची पद्धत नाही, जितेंद्र आव्हाड म्हणाले. विरोधी पक्षाला सभागृहात बोलू दिले जात नाही, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली जात नाही, ही एकप्रकारे थट्टा सुरू असल्याचेही  आव्हाड म्हणाले. 

सत्ताधाऱ्यांचा चर्चेतून पळ- अनिल देशमुखसंयुक्त महाराष्ट्रात विदर्भाचा समावेश करताना नागपूर करारानुसार अधिवेशन विदर्भात घेण्याचे ठरले होते. त्यासाठी हिवाळी अधिवेशन दिड महिने चालायला हवे. थातूर मातूर पॅकेज देऊन विदर्भावर अन्याय करण्याची एकही संधी सरकारने सोडलेली नाही. विदर्भातील सिंचनाचे, शेतकऱ्याचे, विजेचे प्रश्न आ वासून उभे आहेत.त्यात  विदर्भात येऊ घातलेले मोठ मोठे उद्योग गुजरातला पळविले जात आहेत. अशा मुद्यांवरून विरोधकांनी विदर्भातल्या समस्यांवर चर्चेची मागणी केली होती. मात्र या चर्चेतून सत्ताधारी पळ काढत आहेत, असे आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन