शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

नागपूरसह विदर्भाची ‘भाजणी’ : झळांनी होरपळली जनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 23:08 IST

मंगळवारचा दिवस हा विदर्भवासीयांची परीक्षा घेणाराच ठरला. चंद्रपुरात ४७.८ अंश सेल्सिअस तर नागपुरात ४७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. या मोसमातील हे सर्वाधिक तापमान ठरले. नवतप्याचा ताप असाच सुरू राहिला तर यंदा सर्वोच्च तापमानाचा ‘रेकॉर्ड’ मोडीत निघण्याची दाट शक्यता आहे.

ठळक मुद्देचंद्रपूर @ ४७.८, नागपूर @ ४७.५

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंगळवारचा दिवस हा विदर्भवासीयांची परीक्षा घेणाराच ठरला. चंद्रपुरात ४७.८ अंश सेल्सिअस तर नागपुरात ४७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. या मोसमातील हे सर्वाधिक तापमान ठरले. नवतप्याचा ताप असाच सुरू राहिला तर यंदा सर्वोच्च तापमानाचा ‘रेकॉर्ड’ मोडीत निघण्याची दाट शक्यता आहे.मंगळवारी नागपूरसह इतर शहरांत ४७ अंश सेल्सिअसहून अधिक तापमान जाईल, असा अंदाज हवामान खात्याने अगोदरपासूनच वर्तविला होता. मंगळवारी सकाळपासूनच वातावरणातील दाहकता जाणवायला लागली होती. दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत तर उष्ण वाऱ्यांमुळे अक्षरश: भाजणीच होत होती. नागपुरात कमाल ४७.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. सरासरीहून हे तापमान ३.७ अंश सेल्सिअसहून अधिक तर होतेच. शिवाय २४ तासात पाºयामध्ये ०.८ अंश सेल्सिअसची वाढ झाली. किमान ३२.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.विदर्भात पारा ४५ वरचविदर्भात जवळपास सर्वच मुख्य ठिकाणी पारा ४५ अंशांहून अधिक होता. ब्रम्हपुरी येथे ४६.९ अंश सेल्सिअस तर वर्धा येथे ४६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. गडचिरोलीत पारा ४६ अंशांवर गेला होता.आणखी वाढू शकते तापमानहवामान खात्याने अगोदरच विदर्भात ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार नागपुरात आणखी दोन दिवस तापमान ४७ अंशांहून अधिक राहण्याची शक्यता आहे. नागपुरात २३ मे २०१३ रोजी ४७.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले होते. यंदा हा रेकॉर्ड मोडीत निघण्याची शक्यता आहे.तारीख      तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)२२ मे         ४६.०२३ मे         ४६.२२४ मे        ४६.०२५ मे        ४६.३२६ मे       ४६.५२७ मे       ४६.७२८ मे       ४७.५विदर्भातील तापमानकेंद्र           कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)नागपूर       ४७.५ब्रम्हपुरी      ४६.९वर्धा            ४६.५चंद्रपूर        ४७.८गडचिरोली ४६.०अकोला     ४५.६अमरावती  ४५.८यवतमाळ  ४५.०गोंदिया      ४५.५मे महिन्यातील सर्वाधिक तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)तारीख                तापमान२३ मे २०१३        ४७.९२३ मे २००५       ४७.६२८ मे २०१९       ४७.५२ मे २००९        ४७.४२५ मे २०१०      ४७.३

टॅग्स :TemperatureतापमानVidarbhaविदर्भ