शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र बंदला विदर्भात जोरदार प्रतिसाद; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 12:22 IST

भीमा कोरेगाव प्रकरणी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देअनेक बसस्थानकांवर प्रवासी अडकलेपेट्रोलपंप बंदचा नागरिकांना फटकाखासगी बसेसही बंदवैद्यकीय सेवा व औषध दुकाने वगळता सर्व बाजारपेठ बंद

आॅनलाईन लोकमतनागपूर: भीमा कोरेगाव प्रकरणी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाल्याचे वृत्त आहे. वैद्यकीय सेवा व औषध दुकाने वगळता बाजारपेठा, सरकारी व खाजगी वाहतूक सेवा, शैक्षणिक संस्था व अन्य प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती. आंबेडकरी अनुयायांनी सकाळीच मोर्चे काढून सुरू असलेली काही दुकाने बंद करण्याचे आवाहन केले तर काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली होती. काही ठिकाणी तणावाचेही वातावरण निर्माण करणाऱ्या किरकोळ घटना घडल्याचे वृत्त आहे.चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. मूलच्या बसस्थानकावर अनेक प्रवासी सकाळच्या वेळेस अडकून पडले होते. सिंदेवाही व नागभीड येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.नागपूर येथे तुकडोजी चौकात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शहराच्या संवेदनशील भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.गोंदिया जिल्ह्यात नवेगाव बांध येथे भीमसैनिकांनी शांतता रॅली काढली होती.गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज व कुरखेडा येथे संपूर्ण बंद पाळण्यात आला. अमरावती जिल्ह्यात दर्यापूर व तिवसा हे पूर्णपणे बंद होते. तिवसा येथे पेट्रोलपंप बंद ठेवण्यात आले होते. यवतमाळात दुपारी २ वाजेपर्यंत बंदचे आवाहन करण्यात आले. ठिकठिकाणी भीमसैनिक रॅली काढून बंदचे आवाहन करीत फिरत होते. 

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव