शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

आठवलेंची रिपाइं पुन्हा आणणार विदर्भाचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 23:08 IST

केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपचा सहकारी गट रिपाइं (आठवले) एकदा पुन्हा स्वतंत्र विदर्भाची मागणी करीत ठराव आणणार आहे.

ठळक मुद्दे६ सप्टेंबरला विदर्भस्तरीय मेळावा : गडकरी-आठवले-महातेकर उपस्थित राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपचा सहकारी गट रिपाइं (आठवले) एकदा पुन्हा स्वतंत्र विदर्भाची मागणी करीत ठराव आणणार आहे. येत्या ६ सप्टेंबरला वसंतराव देशपांडे सभागृहात दुपारी १ वाजता होणाऱ्या या मेळाव्यात हा ठराव मांडण्यात येईल, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत माहिती दिली.केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपाइं(आठवले)चे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होईल. केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रमुख अतिथी राहतील. राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, महात्मा फुले विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, पक्षाचे राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पटेल आदी प्रामुख्याने उपस्थित राहतील. पदोन्नतीतील आरक्षणाबाबत दलित, मागासवर्गीय, ओबीसी व व्हीजेएनटीमध्ये प्रचंड रोष आहे. राज्य शासनाने १९ डिसेंबर, २०१७ रोजी काढलेल्या अध्यादेशाने पदोन्नतीतील आरक्षण बंद करण्यात आले. उलट १० ऑक्टोबर २०१८ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार खुल्या प्रवर्गातील पदोन्नती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कनिष्ठ कर्मचारीही या परिपत्रकामुळे त्या प्रवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वरिष्ठ ठरत आहे. याविरोधात मोठा मोर्चाही काढण्यात आला. राज्य सरकारने तातडीने यासंदर्भात निर्णय घेऊन पदोन्नतीतील आरक्षण लागू करावे व रोष संपवावा, अशी विनंती थुलकर यांनी केली. पत्रपरिषदेत राजू बहादुरे, राजन वाघमारे, विनोद थूल, डॉ. मनोज मेश्राम, सतीश तांबे, अ‍ॅड. भीमराव कांबळे आदी उपस्थित होते.विधानसभेसाठी विदर्भातून सहा जागांची मागणीआगामी विधानभा निवडणुकीसाठी पक्षाने राज्यात १६ जागांचे प्रस्ताव भाजपकडे दिले आहेत. यानुसार विदर्भातून ६ जागांची मागणी करण्यात आली असून, चार जागा मिळाव्यात अशी अपेक्षा थूलकर यांनी व्यक्त केली. यात वाशिम, मेहकर, उमरखेड, उत्तर नागपूर, चंद्रपूर आणि अर्जुनीमोरगाव या जागांचा समावेश आहे.

टॅग्स :Vidarbhaविदर्भMediaमाध्यमे