शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ राज्य आंदोलन समिती लढविणार निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 01:30 IST

विदर्भ राज्य आंदोलन समितीने येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. समिती या निवडणुका ‘निवडणूक आंदोलन’ म्हणून लढविणार असून, त्यासाठी सर्व विदर्भवादी पक्ष, विदर्भवादी संघटना, शेतकरी संघटना, बेरोजगार संघटनांशी समन्वय साधणार असल्याचे संघटनेचे प्रवक्ते राम नेवले यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

ठळक मुद्देविदर्भ राज्य निर्माण यात्राही काढणार : विदर्भवादी संघटनांशी साधणार संपर्क

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीने येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. समिती या निवडणुका ‘निवडणूक आंदोलन’ म्हणून लढविणार असून, त्यासाठी सर्व विदर्भवादी पक्ष, विदर्भवादी संघटना, शेतकरी संघटना, बेरोजगार संघटनांशी समन्वय साधणार असल्याचे संघटनेचे प्रवक्ते राम नेवले यांनी पत्रपरिषदेत सांगितले.भारतीय जनता पक्षाने गेल्या निवडणुकीत स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन दिले होते. सोबतच अनेक आश्वासनांची खैरात वाटली होती. परंतु गेल्या साडेचार वर्षात एकही आश्वासन खरे ठरले नसल्याचा आरोप समितीने केला आहे. पक्ष २०१९ च्या निवडणुकीच्या तयारीत लागला आहे. यावळी विदर्भ राज्य आंदोलन समिती येत्या निवडणुकीत विदर्भाचा मुद्दा, शेतकऱ्यांचा व बेरोजगारांचा मुद्दा उचलून भाजपाला घेरणार आहे. २०१९ च्या पूर्वी विदर्भ राज्याची निर्मिती करावी, यासाठी भाजपावर दबाव वाढविणार आहे. त्यासाठी ‘विदर्भ द्या अन्यथा विदर्भ सोडा’ यासाठी निवडणुकीला आंदोलन म्हणून लढविणार आहे.त्याचबरोबर समिती स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला जोर देण्यासाठी ‘विदर्भ राज्य निर्माण यात्रा’ काढणार आहे. ही विदर्भातील ११ ही जिल्ह्यातून फिरणार आहे. विदर्भ राज्य निर्मितीचा संदेश घराघरापर्यंत पोहचविणार आहे. विदर्भवादी पक्ष, संघटना, कार्यकर्ते, शेतकरी संघटना यांचा समन्वय करण्यासाठी निवडणूक समिती २५ नोव्हेंबरपासून जिल्हावार दौरे करणार असल्याचे नेवले म्हणाले. पत्रपरिषदेला अ‍ॅड. वामनराव चटप, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रबिरकुमार चक्रवर्ती, अरुण केदार, अरविंद देशमुख, राजकुमार नागुलवार, विजया धोटे, रंजना मामर्डे, मुकेश मासूरकर, विष्णू आष्टीकर, जयंत चितळे उपस्थित होते.

 

टॅग्स :Vidarbhaविदर्भElectionनिवडणूक