शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ माझा पक्ष लढविणार जिल्हा परिषद निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:00 IST

विदर्भातील तीन जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय विदर्भ माझा पक्षाने जाहीर केला आहे.

ठळक मुद्देतीन जिल्ह्यात लढणार : विदर्भाचा मुद्दा राजकीय करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील तीन जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय विदर्भ माझा पक्षाने जाहीर केला आहे. विदर्भाचा मुद्दा अधिक वेगाने राजकीय बनविण्यासाठी आणि विदर्भासंदर्भात असलेले जनमत मतपेटीतून व्यक्त व्हावे यासाठी या निवडणुका लढविल्या जातील, असे पक्षाच्या वतीने शनिवारी पत्रकार परिषदेतून जाहीर करण्यात आले.यासंदर्भात माहिती देताना पक्षाचे संस्थापक राजकुमार तिरपुडे म्हणाले, विदर्भ राज्य निर्मितीचा उद्देश डोळ्यापुढे ठेवूनच या पक्षाची स्थापना झाली आहे. माजी उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे यांच्या कार्याची प्रेरणा यामागे आहे. वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीसाठी पक्षाने प्रत्येक वेळी आपली स्पष्ट भूमिका ठेवली आहे. या वेळीही विदर्भनिर्मितीच्या उद्देशानेच फक्त विदर्भातील तिन्ही जिल्ह्यात आपला पक्ष मैदानात उतरणार आहे. बहुतेक सर्वच जागा पक्षाकडून लढल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.स्थानिक पक्ष बळकट होणार नाही आणि मागणीसाठी भक्कमपणे पुढे येणार नाही, तोपर्यंत राज्यनिर्मितीचे वातावरण तयार होणार नाही. तेलंगणाच्या निर्मितीपूर्वी स्थानिक राजकीय पक्षांनी वारंवार निवडणुका लढविल्या. त्यातून राज्यनिर्मितीसंदर्भात असणारे जनमत स्पष्ट होत गेले. ९० ते ९५ टक्के जनता विदर्भ राज्य निर्मितीच्या बाजूने असल्याचा दावा तिरपुडे यांनी यावेळी केला. मतदानातून नागरिकांनी तो व्यक्त करावा, अशी विनंती आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका दीपक पालीवाल यांच्या नेतृत्वात तर पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष अजाबराव टाले यांच्या नेतृत्वात अकोला आणि वाशीम जिल्ह्यातील निवडणुका लढविल्या जातील, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला दीपक पालीवाल, बाबा कोंबाडे, मंगेश तेलंग, किरण बोरकर, संजय कटकमवार, ज्ञानेश्वर गुरव आदी उपस्थित होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूक