शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ हॉकी संघाला अपात्र ठरवले : निर्णयाला हायकोर्टात आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 19:44 IST

अंतर्गत वादामुळे विदर्भ हॉकी संघटनेची सदस्यता निलंबित करून विदर्भ हॉकी संघाला आगामी राष्ट्रीय स्पर्धांसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. त्या निर्णयाविरुद्ध संघटनेचे अध्यक्ष बी.सी. भरतिया व सचिव विनोद गवई यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. वादग्रस्त निर्णय रद्द करून विदर्भ हॉकी संघाला राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची अनुमती देण्यात यावी अशी मागणी त्यांनी न्यायालयाला केली आहे.

ठळक मुद्दे निर्णय रद्द करण्याची विनंती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंतर्गत वादामुळे विदर्भ हॉकी संघटनेची सदस्यता निलंबित करून विदर्भ हॉकी संघाला आगामी राष्ट्रीय स्पर्धांसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. त्या निर्णयाविरुद्ध संघटनेचे अध्यक्ष बी.सी. भरतिया व सचिव विनोद गवई यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. वादग्रस्त निर्णय रद्द करून विदर्भ हॉकी संघाला राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची अनुमती देण्यात यावी अशी मागणी त्यांनी न्यायालयाला केली आहे.हॉकी इंडियाचे कार्यकारी संचालकांनी ७ जानेवारी २०१९ रोजी संबंधित वादग्रस्त आदेश जारी केला आहे. विदर्भ हॉकी संघटनेमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे. त्यासंदर्भात हॉकी इंडियाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. हॉकी इंडियाचे अध्यक्ष व सचिव यांनी त्या तक्रारींची दखल घेऊन विदर्भ हॉकी संघटनेचे सदस्यत्व निलंबित करण्याचे निर्देश दिलेत. त्यानुसार संघटनेचे सदस्यत्व निलंबित करून संघटनेच्या संघाला आगामी विविध राष्ट्रीय स्पर्धांसाठी अपात्र ठरविण्यात आले. संघटनेने याविरुद्ध सुरुवातील हॉकी इंडियाकडे आक्षेप नोंदवले होते. तसेच, अंतर्गत वादावर स्पष्टीकरण दिले होते. परंतु, त्यांना दिलासा मिळाला नाही. परिणामी, त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.हॉकी इंडियाला नोटीसउच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी सोमवारी केंद्रीय क्रीडा विभागाचे सचिव, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष व सचिव, हॉकी इंडियाचे महासचिव, अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांना नोटीस बजावून यावर १८ मार्चपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिलेत. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. रोहित शर्मा यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयHockeyहॉकी