शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

आरोग्य विद्यापीठाचा दीक्षांत सोहळ्यात विदर्भाचा पदरी आठ पदके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:08 AM

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकचा मंगळवारी पार पडलेल्या १९व्या दीक्षांत सोहळ्यात विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना ६२ सुवर्णपदके देऊन गौरविण्यात आले. यात विदर्भातील महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके पटकाविली.

ठळक मुद्देमेयो, डेंटल, एनकेपी साळवे, एसडीकेएस डेंटल कॉलेज, आयुर्वेद कॉलेज व व्ही.एस.पी.एम. कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा समावेश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकचा मंगळवारी पार पडलेल्या १९व्या दीक्षांत सोहळ्यात विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना ६२ सुवर्णपदके देऊन गौरविण्यात आले. यात विदर्भातील महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके पटकाविली. परंतु नामवंत महाविद्यालयाच्या तुलनेत फार कमी पदके पदरी पडल्याने आश्चर्यही व्यक्त केले जात आहे.आरोग्यविद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये घेतलेल्या दीक्षांत सोहळ्यात पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासिता पूर्ण केलेल्या शाखांचा ४८७२ विद्यार्थ्यांना पदवी, ५५३६ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी व १००१ विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आला. सोहळ्यात संशोधन पूर्ण केलेल्या १४ विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली. तर विविध शाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. यात नागपुरातील एनकेपी साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथील सुशांत अईलदासानी याला ‘असोसिएशन ऑफ फिजीशियन नाशिक चॅप्टर-२०११’चे सुवर्ण पदक, याच महाविद्यालयातील विजया सिंग याला ‘डॉ. कुणाल एल. महादुले’ सुवर्ण पदक, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) दीक्षा शर्मा हिला ‘विजयादेवी फडतरे स्मृती’ सुवर्ण पदक, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील सुकिर्ती तिवारी हिला ‘डॉ. आय. सी. दुधानी’ सुवर्ण पदक, याच महाविद्यालयातील हर्पित कौर याला ‘डॉ. दिनेश के. दफ्तरी’ सुवर्ण पदक, एसडीकेएस डेंटल कॉलेजमधील स्वाती आनंद राय हिला ‘डॉ. आय.सी. दुधानी’ सुवर्ण पदक, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील प्रगती बनसोड हिला ‘दलित मित्र नेत्र तज्ज्ञ डॉ. के. जी. जयस्वाल स्मृती’ सुवर्ण पदक व व्ही.एस.पी.एम कॉलेज ऑफ फिजीओथेरपीच्या प्रियाल यादव याला ‘ डॉ. अली इराणी’ सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. ६२ सुवर्णपदकांमधून ही आठ पदके विदर्भातील विद्यार्थ्यांनी मिळवली आहेत. यातही मुलींनी बाजी मारली आहे.विशेष म्हणजे, राज्यात नामवंत असलेल्या नागपुरातील मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी २०१६ मध्ये नऊपेक्षा जास्त सुवर्ण पदके पटकाविली होती. परंतु यावर्षी एकही सुवर्ण पदक मिळाले नसल्याने निराशा व्यक्त केली जात आहे. यावर बोलताना मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा म्हणाले, दरवर्षी सुवर्ण पदके प्राप्त करण्याचा प्रयत्न असतो. विद्यार्थ्यांकडून तशी तयारीही केली जाते. परंतु यावर्षी अपयश आले. पुढील वर्षी आणखी प्रयत्न केले जाईल.

टॅग्स :Healthआरोग्यuniversityविद्यापीठVidarbhaविदर्भ