शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण व एरोस्पेस क्षेत्रात उद्योग वाढीसाठी विदर्भ अनुकूल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:39 IST

संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील उद्योगवाढीसाठी विदर्भ आणि नागपूरमध्ये अतिशय पोषक वातावरण असून, या क्षेत्रातील उद्योजकांनी विदर्भात गुंतवणूक करावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असो.ची परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील उद्योगवाढीसाठी विदर्भ आणि नागपूरमध्ये अतिशय पोषक वातावरण असून, या क्षेत्रातील उद्योजकांनी विदर्भात गुंतवणूक करावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या ‘मेड इन विदर्भ इन डिफेन्स अ‍ॅण्ड एरोस्पेस शिखर परिषदेत’ मुख्य अतिथी म्हणून फडणवीस बोलत होते. यावेळी विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष माजी लेफ्टनंट जनरल रवींद्र थोडगे, स्लोव्हाकियाच्या यूडीएस कंपनीचे अध्यक्ष थॉमस मॅरोस, टाटा टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष आनंद भदे, भारत अर्थ मुव्हर्स लि.चे वित्तीय संचालक सुरेश प्रकाश, भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.चे व्यवस्थापकीय अध्यक्ष दिनेश बत्रा आणि सोलर इंडस्ट्रीज इंडिया लि.चे अध्यक्ष सत्यनारायण नवाल उपस्थित होते.उद्योगासाठी उच्च तंत्रज्ञानाची आवश्यकताआगामी काळात संरक्षण क्षेत्रात उद्योगासाठी मोठी संधी आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सत्यनारायण नवाल हे या क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्त्व आहे. एरोस्पेस उद्योग वाढविण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. या क्षेत्रात नाविन्यपूर्णतेसोबतच रोजगाराची नवी दालने युवकांसाठी खुली होत आहे, ही बाब निश्चित सुखावणारी आहे. संरक्षण आणि एरोस्पेस उद्योग क्षेत्र वाढण्यासाठी विदर्भात मोठ्या संधी आहेत. मिहानमध्ये रिलायन्सचा एरोस्पेस निर्मिती कारखाना सुरू होत आहे. केवळ एअर क्राफ्टचे सुटेभाग विदर्भात तयार होण्यापेक्षा संपूर्ण एअरक्राफ्ट येथे तयार होण्याची इच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.प्रारंभी संबंधित उद्योगाच्या आवश्यक तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान करण्यासाठी स्लोव्हाकियाच्या यूडीएस कंपनी, इंडो स्लोव्हा चेंबर आॅफ कॉमर्स, टाटा टेक्नॉलॉजी तसेच महाराष्ट्र शासन आणि विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशनच्या संकेतस्थळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.संचालन माजी मेजर जनरल अनिल बाम यांनी तर आभार विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशनचे दुष्यंत देशपांडे यांनी मानले. यावेळी विदर्भातील उद्योजक, गुंतवणूकदार उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूर