शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात  होळीच्या पर्वावर ‘डिग्री जलाओ’ आंदोलन : वामनराव चटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 22:08 IST

भाजपाने निवडणुकीच्या वेळी दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देण्याची घोषणा केली होती. मात्र, नोटाबंदी व जीएसटीनंतर दोन कोटींहून अधिक लोक बेरोजगार झाले. याच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीतर्फे होळीच्या पर्वावर १ मार्च रोजी विदर्भातील अकराही जिल्हास्तरावर तसेच तालुका स्तरावर ‘डिग्री जलाओ’ आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा समितीचे नेते माजी आ. वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देविदर्भ राज्य आंदोलन समिती : १६ व १७ एप्रिलला राष्ट्रीय अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :भाजपाने निवडणुकीच्या वेळी दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देण्याची घोषणा केली होती. मात्र, नोटाबंदी व जीएसटीनंतर दोन कोटींहून अधिक लोक बेरोजगार झाले. याच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीतर्फे होळीच्या पर्वावर १ मार्च रोजी विदर्भातील अकराही जिल्हास्तरावर तसेच तालुका स्तरावर ‘डिग्री जलाओ’ आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा समितीचे नेते माजी आ. वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत केली.चटप म्हणाले, महाराष्ट्रात सरकारी नोकऱ्यातील १९ लाख ५० हजार पदे रिक्त आहेत. यापैकी २ लाख ५९ हजार पदे पाच वर्षात न भरल्यामुळे नेहमीसाठी निरस्त झाली आहेत. पगार द्यायला पैसे नाहीत म्हणून तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती बंद केली आहे. आता तर पुन्हा ३० टक्के नोकरीची पदे कमी केली जाणार आहेत. सरकारचे असेच धोरण राहिले तर सुशिक्षित बेरोजगार युवकांनी त्यांच्या डिग्रीचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बेरोजगार युवक रस्त्यावर उतरून डिग्रीची होळी करून दोन कोटी नोकऱ्या कुठे आहेत, असा सवाल भाजपाला विचारणार आहेत.विदर्भ राज्य आंदोलन समितीचे दुसरे राष्ट्रीय अधिवेशन १६ व १७ एप्रिल रोजी नागपुरातील देशपांडे सभागृहात होणार आहे. या अधिवेशनात विदर्भाच्या लढ्याची दिशा निश्चित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सोबतच १ मे रोजी महाराष्ट्र दिनी नागपूरच्या विधानभवनावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकवण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.

टॅग्स :Wamanrao Chatapवामनराव चटपagitationआंदोलन