शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

विदर्भातील उद्योजकांनी सौरऊर्जेवर भर द्यावा  : ऊर्जामंत्री नितीन राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 23:35 IST

उद्योजकांनी सौरऊर्जेची अधिकाधिक निर्मिती करून वापर करण्यावर भर द्यावा, असे आवाहन पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी येथे केले.

ठळक मुद्देव्हीआयएच्या बैठकीत उद्योगाचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी राज्य शासन तत्पर असून, उद्योगांना लागणारी वीज अल्पदरात उपलब्ध करून देण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. मात्र त्यासोबतच उद्योजकांनी सौरऊर्जेची अधिकाधिक निर्मिती करून वापर करण्यावर भर द्यावा, असे आवाहन पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी येथे केले.विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनने उद्योगभवन येथे आयोजित केलेल्या उद्योजकांसोबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश राठी, प्रशांत मोहता, सुरेश अग्रवाल, राजेंद्र गोयंका, गौरव सारडा आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांची प्रमुख उपस्थिती होती.विदर्भातील उद्योगांना पोषक वातावरण असूनही उद्योगांना हवी तशी गती मिळत नाही. हिंगणा, बुटीबोरी, मिहान औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांचा विकास करताना उद्योजकांनी येत असलेल्या अडचणींबाबत प्रस्ताव सादर करावेत. नागपूर तसेच विदर्भात वीजनिर्मिती होत असल्याने येथील उद्योगांना कमी दरात वीज पुरवण्याचा प्रयत्न केला जाईल. शासन विजेचे दर लगेच वाढविणार नाही. पण उद्योगांनीही नियमित वीज बिल भरत हरित ऊर्जा आणि सौरऊर्जेकडे वळणे काळाची गरज बनली आहे, असे राऊत म्हणाले.विदर्भात मोठे उद्योग आणताना त्यासाठी ग्रोथ इंजिन ठरू शकणाऱ्या घटकांना चालना देण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न करण्यात येईल. केवळ उद्योगच नाही तर येथे खाण प्रकल्प, पर्यटनवाढीवर भर देणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विदर्भात मोठा कारखाना उभारणीची घोषणा केली आहे. त्यामुळे अ‍ॅडव्हान्टेज विदर्भासारखा ‘इनक्रेडिबल विदर्भ’उपक्रम विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भात उद्योग सुरू करताना लागणारी परवानगीची कागदपत्रे विदर्भातच मिळतील याबाबत प्रयत्न करू, असे आश्वासनही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी उद्योजकांना दिले.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतelectricityवीज