शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न : छळ अन् बलात्काराचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:16 IST

विवाहित व्यक्तीसोबत लग्नाच्या मुद्यावरून एका तरुणीचा वाद विकोपाला गेल्याने तिने गांधीसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूच्यांनी तिला लगेच बाहेर काढल्याने तिचा जीव वाचला. नंतर तिने आपल्या विवाहित प्रियकराविरुद्ध लैंगिक छळासह अनेक आरोप लावले. प्रकरण गणेशपेठ पोलिसांकडून अंबाझरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. या प्रकरणी वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ठळक मुद्देविवाहित व्यक्तीसोबत लग्नाच्या मुद्यावरून वादनागपुरातील अंबाझरी पोलीस ठाण्यात रात्रीपर्यंत वातावरण गरम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विवाहित व्यक्तीसोबत लग्नाच्या मुद्यावरून एका तरुणीचा वाद विकोपाला गेल्याने तिने गांधीसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूच्यांनी तिला लगेच बाहेर काढल्याने तिचा जीव वाचला. नंतर तिने आपल्या विवाहित प्रियकराविरुद्ध लैंगिक छळासह अनेक आरोप लावले. प्रकरण गणेशपेठ पोलिसांकडून अंबाझरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. या प्रकरणी वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.तक्रार करणारी तरुणी आणि ज्याच्यावर तिने बलात्काराचा आरोप लावला तो आरोपी अमरावती जिल्ह्यातील लोणी गावचे रहिवासी आहेत. त्यांच्यात गेल्या सहा वर्षांपासून संबंध आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघांमधील वाद वाढला. त्यामुळे आठ दिवसांपूर्वी तरुणीने अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी धाव घेतली. पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करताच तिने घूमजाव केले. आपल्याला तक्रार द्यायची नाही, असे स्वत:च तिने पोलिसांना लिहून दिले. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे टाळले. दरम्यान, या दोघांमधील वाद गेल्या आठ दिवसांत पुन्हा तीव्र झाला. त्यामुळे तिने मंगळवारी दुपारी नागपूर गाठले. ती सरळ गांधीसागर तलावावर पोहचली. तिने उडी घेताच तिला काहींनी पाण्यातून बाहेर काढले. तेथे जमलेल्या गर्दीत विवाहित प्रियकराच्या छळामुळे आपण आत्महत्या करणार होती, असे तिने सांगितले. त्यामुळे काहींनी गणेशपेठ पोलिसांना कळविले. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला. प्रकरणाची सुरुवात अंबाझरी ठाण्यातून झाल्याचे कळाल्याने, त्यांनी तिला अंबाझरी पोलीस ठाण्यात पाठविले. येथे पोलिसांनी तिची सविस्तर तक्रार नोंदवून घेतली. पोलिसांच्या माहितीनुसार, तिने आपल्या विवाहित प्रियकराविरुद्ध बलात्कार करून धमकी दिल्याचा आरोप लावल्याचे समजते.पोलिसांची सावध कारवाईया प्रकरणात तिचा पूर्वानुभव आल्यामुळे पोलिसांनी तिची सावधगिरीने विचारपूस केली. त्यानंतर तिची तिच्याच हस्ताक्षरात प्रारंभी तक्रार लिहून घेतली, नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. या प्रकरणात बलात्काराचा गुन्हा दाखल होणार असल्याचे संकेत वृत्त लिहिस्तोवर अंबाझरी पोलिसांकडून मिळाले होते. मात्र, ऐनवेळी तिने घूमजाव करू नये आणि प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून अंबाझरी पोलीस रात्री ११ पर्यंत गुन्हा दाखल करण्याच्या संबंधाने वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेत होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार