शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरनजीक पारडीत बॉयलरने घेतला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 20:08 IST

काजूच्या छिलक्यापासून तेल तयार करणाऱ्या कंपनीत बॉयलरचा अपघात घडून एका तरुणाचा मृत्यू झाला. महेश राजू आकरे (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो भंडारा मार्गावरील खरबी नाक्याजवळ राहात होता.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काजूच्या छिलक्यापासून तेल तयार करणाऱ्या कंपनीत बॉयलरचा अपघात घडून एका तरुणाचा मृत्यू झाला. महेश राजू आकरे (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो भंडारा मार्गावरील खरबी नाक्याजवळ राहात होता.पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कापसी उमिया वसाहतीत काजूच्या छिलक्यापासून तेल तयार करणाºया कंपनीचा कारखाना आहे. येथे महेश आकरे कार्यरत होता. २९ मेच्या सकाळी ८.३० च्या सुमारास नेहमीप्रमाणे आकरे तिथे काम करीत असताना तेल तयार करणाºया बॉयलर मशीनचा व्हॉल्व्ह जाम झाला. त्यामुळे आतमधील गॅस बाहेर जाऊ शकली नाही. आतमधून प्रचंड दबाव वाढल्यामुळे तेलाच्या बॉयलरचे झाकण वर उडाले आणि त्यातील उकळते तेल आकरेच्या अंगावर पडले. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरिता भवानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना बुधवारी रात्री ११.३४ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. चंद्रशेखर लीलाराम निमजे (वय ३४, रा. मौदा) यांनी पारडी पोलिसांकडे माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

कुटुंब झाले निराधारगरीब परिवारातील सदस्य असलेल्या आकरे याच्यावर घरच्या कुटुंबाचा गाडा चालविण्याची जबाबदारी होती. त्याचा मृत्यू झाल्यामुळे त्याचा परिवार निराधार झाला असून, परिवारातील सदस्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कारखाना मालक त्याच्या मृत्यूची भरपाई कशी करतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Deathमृत्यूBlastस्फोट